शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : 'कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा दोष नाही; तर 'या' कारणामुळे आली दुसरी लाट'; डॉक्टरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 13:09 IST

CoronaVirus News & Latest Updates : दुसऱ्या लाटेपेक्षा शिक्षित आणि मध्यमवर्गीय लोक वाढत्या उद्रेकाला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. 

भारतात कोरोना व्हायरसच्या लाटेला लोक जबाबदार आहेत. कोरोना इन्फेक्शनपासून बचावासाठी मागच्या वर्षापासून ज्या उपयायोजना राबवल्या जात होत्या. ज्यापद्धतीनं काळजी घेतली जात होती. त्यात निष्काळजीपणा होताना दिसून आला. इंडियन  काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) चे माजी संचालक डॉ. वी एम कटोच यांनी दैनिक भास्करशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा शिक्षित आणि मध्यमवर्गीय लोक वाढत्या उद्रेकाला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. 

१ मे पासून १८ वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार थांबेल का?

यावर त्यांनी सांगितले की, ''लस म्हणजे काही जादूची छडी नाही. लसीमुळे फक्त एक सुरक्षा कवच मिळते. त्यामुळे  कोरोना संक्रमणाची तीव्रता कमी होते. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन कामगार नेहमीच सामान्यांच्या संपर्कात राहतात. म्हणूनच सरकारनं त्यांना सगळ्यात आधी लस त्यांना लस दिली. कोरोनाची लस घेतल्यानंतर लोकांनी नियमांचे पालन केले तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो.'' 

 कोरोना संक्रमणाचा धोका ३१ टक्क्यांनी कमी करणार हा सोपा उपाय; संशोधनातून खुलासा

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट अधिक तीव्र झाली?

डॉ. कटोच म्हणाले  की, ''लोक आपल्या निष्काळजीपणाचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडत आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची संक्रामता जास्त आहे. पण कोरोनाशी निगडीत इतर गोष्टींशी सावधगिरी बाळगल्यास संक्रमणाचा धोक कमी होतो. मागच्या वर्षी ज्या उपायांचे पालन केले जात होते. त्याचप्रकारे आताही सातत्यानं नियम पाळायला हवेत.''

दुसऱ्या लाटेच्या संक्रमणाची तीव्रता  कधी कमी होणार?

या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ''जर आज कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोकांनी आवश्यक उपाययोजना केल्या तर 20-25 दिवसात नवीन संक्रमितांची संख्या कमी होईल. परंतु त्यासाठी कोरोनाशी संबंधित उपायांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. गेल्या वर्षी सरकारने निर्बंध लादले होते.

 कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव

यामागील एकमेव कारण म्हणजे लोकांचा संपर्क कमी असावा जेणेकरून व्हायरस जास्त पसरू नये. गेल्या वर्षीही लाट सुशिक्षित मध्यमवर्गामुळे पसरली होती. परदेशातून आलेल्या लोकांनी निष्काळजीपणाने लोकांमध्ये संसर्ग पसरविला. तेव्हा आपण लस न देता देखील कोरोना संसर्गाला कमी  केले होते.''

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाHealthआरोग्य