CoronaVirus News: तुमची फुफ्फुसं किती सक्षम?; घरच्याघरी तपासून पाहण्यासाठी वापरा सोपी ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 14:49 IST2021-05-07T14:46:51+5:302021-05-07T14:49:03+5:30
CoronaVirus News: कोरोना संकटात फुफ्फुसांची काळजी घेणं अतिशय गरजेचं

CoronaVirus News: तुमची फुफ्फुसं किती सक्षम?; घरच्याघरी तपासून पाहण्यासाठी वापरा सोपी ट्रिक
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मे महिन्यात तीन वेळा कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला आहे. साधा ताप, सर्दी झाल्यास, दम लागल्यावरही आता अनेकांना भीती वाटते. कोरोना विषाणू थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य रोखणं अतिशय गरजेचं आहे. कोरोना संकट काळात फुफ्फुसांची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमची फुफ्फुसं उत्तम स्थितीत आहे ना, याची घरच्या घरी पडताळणी करून पाहणं अतिशय सोपं आहे.
रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लशीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, राज्य सरकारचं जोरदार 'प्लानिंग'!
मेदांता रुग्णालयाचे डॉ. अरविंद कुमार यांनी फुफ्फुसांची क्षमता तपासून पाहण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. घरबसल्या श्वास रोखून आणि ६ मिनिटं चालून तुम्ही फुफ्फुसांची क्षमता तपासू शकता. यासाठी एका जागी बसा आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास रोखून धरा. जितका जास्त वेळ श्वास रोखता येत असेल तितका वेळ श्वास रोखून धरा. प्रत्येक तासातून एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास रोखण्याचा सराव करा. श्वास रोखून धरण्याचा कालावधी रोज २-३ सेकंदांनी वाढत असेल आणि तो २५ ते ५० सेकंदांच्या वर असेल, तर याचा अर्थ तुमची फुफ्फुसं उत्तम स्थितीत आहेत.
कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?
फुफ्फुसांच्या स्थितीसोबतच शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशनदेखील तपासून पाहणं गरजेचं आहे. शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासून बघा. त्यानंतर ६ मिनिटं चाला. त्यानंतर ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासून बघा. सॅच्युरेशनमध्ये ३-४ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत नसेल तर तुमची फुफ्फुसं सशक्त आहेत. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कोरोना संकट काळात फुफ्फुसं व्यवस्थित राखणं अतिशय गरजेचं आहे. फुफ्फुसं उत्तम राखण्यासाठी तुम्ही घरच्या घरी व्यायामदेखील करू शकता.