CoronaVirus News covid task chief dr sanjay oak on how when and how to use remdesivir | CoronaVirus News: ...तेव्हाच रेमडेसिविरचा वापर करावा; कोविड टास्क प्रमुखांची हात जोडून कळकळीची विनंती

CoronaVirus News: ...तेव्हाच रेमडेसिविरचा वापर करावा; कोविड टास्क प्रमुखांची हात जोडून कळकळीची विनंती

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. मागील ४ दिवस देशात दिवसाकाठी दीड लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १ लाख ८४ हजार ३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. (covid task chief Dr. Sanjay Oak on how when and how to use remdesivir)

कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड! गेल्या 24 तासांत 1,84,372 नवे रुग्ण; 'या' आकडेवारीने वाढवली चिंता 

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाबाधितांचे नातेवाईक, कुटुंबीयांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सर्वांना अतिशय कळकळीचं आवाहन केलं आहे. 'रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही. रेमडेसिविर घेतल्यानं प्राण वाचले असं होत नाही. त्यानं फार फार तर रुग्णाचा रुग्णालयातला कालावधी १ ते २ दिवसांनी कमी होतो,' असं डॉ. ओक यांनी सांगितलं.

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना भारतासाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारला मोठा दिलासा

औषध विविध प्रकारची असतं. रेमडेसिविर हे अँटिव्हायरल प्रकारात मोडणारं औषध आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसची शरीरात वाढ मोठ्या प्रमाणात होते, ती रोखण्याचं काम रेमडेसिविर करतं. मी डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगतो की रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही. रेमडेसिविर दिल्यानं प्राण वाचले असं होत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. शरीरातील ऑक्सिजनची पातळी, व्हिटामिन सी, झिंक, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रेमडेसिविर योग्य त्या रुग्णालाच दिलं जावं. ते सरसकट देण्याचं औषध नाही, असं ते पुढे म्हणाले.

काही कोरोना रुग्णांचे नातेवाईक घरीच उपचार व्हावेत यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण रेमडेसिविर हे कुठेही आणि कधीही देण्याचं औषध नाही. रेमडेसिविर घरी दिलं जाऊ नये. ते त्या प्रकारचं औषध नाही. ते रुग्णालयातलं औषध आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला २ ते ९ दिवसांच्या कालावधीत रेमडेसिविर द्यायचं असतं. काही ठिकाणी रुग्णांना ९ ते १४ दिवस रेमडेसिविर दिलं जातं आहे. त्याचा उपयोग होत नाही. रेमडेसिविर केवळ ५ डोसेसमध्ये द्यायचं औषध आहे, असं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News covid task chief dr sanjay oak on how when and how to use remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.