शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट 'NeoCov' भारतासाठी किती धोकादायक? जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:46 IST

NeoCov Variant : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे की, 'निओकोव्ह'च्या क्षमतेसाठी अधिक स्पष्टतेची आवश्यकता आहे.

नवी दिल्ली : चिनी शास्त्रज्ञांना दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) वटवाघुळांमध्ये  (Bat) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) एक नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' (NeoCov) आढळला आहे. या 'निओकोव्ह'मध्ये म्यूटेशनची क्षमता अधिक असल्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे की, 'निओकोव्ह'च्या क्षमतेसाठी अधिक स्पष्टतेची आवश्यकता आहे. तर आयडीएफ अध्यक्षांनी दावा केला की, 'निओकोव्ह'पासून भारताला कोणताही धोका नाही.

'निओकोव्ह' का धोकादायक?चीनच्या वुहान विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मते, 'निओकोव्ह' सार्स-सीओवी-2  प्रमाणेच मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकतो. हा व्हायरस मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरसच्या (MERS-Cov) सर्वात जवळचा आहे.

प्राणघातक व्हेरिएंट म्हणून चेतावणी जारीचीनमधील वुहान शहरात 2019 मधील शेवटच्या महिन्यांत पहिल्यांदा कोरोना व्हायरस आढळून आला होता. याठिकाणी आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका परंतु सर्वात धोकादायक आणि प्राणघातक 'निओकोव्ह' व्हेरिएंटबद्दल चेतावणी जारी केली आहे. वुहानमधील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, हा एक नवीन व्हेरिएंट आहे, ज्यामध्ये संक्रमणाचा मृत्यू दर सर्वाधिक आहे.

सार्स-सीओवी-2 सारखा आहे 'निओकोव्ह''निओकोव्ह' व्हायरस अनेक वर्षांपूर्वी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये सापडला होता आणि तो सार्स-सीओवी-2  सारखाच आहे, ज्यामुळे मानवांमध्ये कोरोना व्हायरस होतो. तर 'निओकोव्ह'चा शोध वटवाघळांमध्ये दक्षिण आफ्रिकेत लागला होता. दरम्यान, या नवीन व्हेरिएंटच्या कोरोना व्हायरसला आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्ये पसरताना दिसून आले आहे.

'निओकोव्ह'मुळे धोका नसल्याचा दावाइंटरनेशनल डायबिटीज फेडरेशनचे (आयडीएफ) अध्यक्ष डॉ. शशांक जोशी यांनी एक ट्विट केले आहे. 'निओकोव्ह' रहस्याचा पर्दाफाश : 1. निओकोव्ह हा MERS Cov शी जवळचा संबंध असलेला जुना व्हायरस आहे. हा DPP4 रिसेप्टर्सद्वारे पेशींमध्ये प्रवेश करतो. 2. नवीन काय आहे : 'निओकोव्ह' वटवाघुळांचे ACE2 रिसेप्टर्स वापरू शकते, परंतु हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्यात नवीन म्यूटेशन असेल. याशिवाय बाकी सर्व काही प्रचार आहे, असे ट्विट डॉ. शशांक जोशी यांनी करत एकप्रकारे या व्हायरसमुळे धोका नसल्याचे म्हटले आहे. 

'निओकोव्ह'बद्दल अधिक अभ्यास करण्याची गरजदरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, नुकताच दक्षिण आफ्रिकेत वटवाघळांमध्ये सापडलेला 'निओकोव्ह' कोरोना व्हायरस मानवांसाठी धोकादायक आहे का? या प्रश्नावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. तर रशियामधील व्हॉयरोलॉजी अँड बॉयोटेक्नॉलॉजी विभागाने गुरुवारी 'निओकोव्ह' संदर्भात एक निवेदन जारी केले. यात म्हटले आहे की, सध्या 'निओकोव्ह' मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास सक्षम नाही. नवीन कोरोना व्हायरस मानवांमध्ये पसरतो की नाही, हा सध्या प्रश्न नाही. तर त्याच्या जोखीम आणि क्षमतांबद्दल अधिक अभ्यास आणि तपासणी करण्याचा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य