शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चिंताजनक! मार्चपर्यंत 'या' देशात वेगानं वाढणार कोरोनाचा नवा स्ट्रेन; वैज्ञानिकांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 11:47 IST

CoronaVirus News & Latest Updates : आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन मार्चपर्यंत अमेरिकेतील मोठ्या समुहाला संक्रमित करू शकतो. 

जगभरातील वेगवेगळ्या देशात  कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. तरीसुद्धा कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या प्रसारानं जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसनं सगळ्यात जास्त संक्रमित असलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे.  अमेरिकन अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत धोक्याची सुचना दिली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन मार्चपर्यंत अमेरिकेतील मोठ्या समुहाला संक्रमित करू शकतो. 

गेल्या शुक्रवारी अमेरिकेचे नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जिओ बायडन यांनी कोरोनाच्या माहामारीशी लढण्यासाठी आपली योजना समोर ठेवली.  ज्यात असं म्हटलं होतं की,  लसीकरण प्रक्रिया अधिक वेगानं करावी लागणार. त्याचवेळी अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशनने याबाबत धोक्याची सुचना दिली आहे. 

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही आठवड्यात कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनचा प्रसार वेगानं होताना दिसून येत आहे. हिवाळ्यात सुरूवातीपासूनच कोरोना संक्रमणाच्या प्रकरणात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशा स्थितीत नवीन स्ट्रेनचा प्रसार वाढल्यास आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा नवा स्ट्रेन अपेक्षेपेक्षा जास्त संक्रामक असू शकतो. पण याबाबत अद्याप कोणताही पुरावा सापडलेला नाही. सध्या तयार करण्यात आलेल्या लसी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरणार नाहीत असं काही तज्ज्ञांचे मत असून अमेरिकन कंपनी फायजरची कोरोनी लस लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर या नवीन स्ट्रेनशी लढण्यासाठी प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. हिवाळ्यात 'या' ५ पीठांपासून बनवलेली भाकरी खाल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाणं विसराल

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा धोका लक्षात  घेता अनेक देशांच्या  विमान सेवांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. यात इटलीचासुद्धा समावेश आहे. इटलीने ब्राझिलच्या उड्डानांवर बंदी घातली असून आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्जा यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार १४ दिवसांमध्ये ज्यांनी ब्राझिलमध्ये प्रवास होता त्यांना इटलीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं आहे.  

दरम्यान ब्राझिल ते इटली प्रवास करत असलेल्या लोकांना कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची चाचणी करणं आवश्यक असणर आहे.  वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन स्ट्रेनचे अध्ययन करणं गरजेचं असून लोकांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. जीवघेण्या ठरू शकतात भेसळयुक्त पीठाच्या चपात्या; 'असा' ओळखा बनावट अन् चांगल्या पीठातील फरक

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या