शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

"थंडीच्या दिवसांत आणखी वेगाने पसरणार कोरोना, 6 फुटांचं अंतरही ठरेल कुचकामी!"

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 15, 2020 6:21 PM

या अहवालांत सांगण्यात आले आहे, की सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही. आतापर्यंत जगभरात कोरोनाने जवळपास 11 लाख लोकांचा बळी घेतला आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोनाने जवळपास 11 लाख लोकांचा बळी घेतला आहे. सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही.घर आणि इमारतीत वॉक-इन फ्रिज आणि कूलर अथवा जेथे तापमान कमी आणि आर्द्रता अधिक असते, अशा ठिकाणी हे थेंब 6 मीटरपर्यंत (19.7 फूट) जाऊ शकतात.

लॉस ऐन्जिलिस - कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली तेव्हा, उन्हाळा येताच अथवा गरमीच्या दिवसांत कोरोना नष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, तसे झाले नाही आणि आता जगभरात कोरोनाने जवळपास 11 लाख लोकांचा बळी घेतला आहे. हा व्हायरस एअरोसॉल (Aerosol) पार्टिकल्सच्या माध्यमाने गरमीच्या दिवसांत पसरत होता. आता श्वसन क्रीयेद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या माध्यमाने (Respiratory droplets) थंडीच्या दिवसांत तो पसरण्याचा वेग अधिक वाढेल. या थेंबांच्या संपर्कात आल्याने कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता एका ताज्या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. हे संशोधन Nano Letters जर्नलने प्रसिद्ध केले आहे.

6 फुटांचे अंतर पुरेसे नाही -या अहवालांत सांगण्यात आले आहे, की सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही. या संशोधनातील एक संशोधक यानयिंग झू यांनी सांगितले, की हे थेंब सहा फुटांपेक्षाही अधिक दूर जातात हे त्यांच्या संशोधनातील अधिकांश प्रकरणांत दिसून आले आहे. एवढे अंतर अमेरिकेच्या CDCने (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. 

थंड ठिकाणी धोका अधिक -घर आणि इमारतीत वॉक-इन फ्रिज आणि कूलर अथवा जेथे तापमान कमी आणि आर्द्रता अधिक असते, अशा ठिकाणी हे थेंब 6 मीटरपर्यंत (19.7 फूट) जाऊ शकतात. यानंतर ते जमिनीवर पडतात. अशात, हा व्हायरस काही मिनिटांपासून ते एक दिवसापर्यंत संक्रमक होऊ शकतो, असे झू म्हणाले.

थेंब व्हायरस पसरवतात -गरमीच्या दिवसांत अथवा कोरड्या ठिकाणी या थेंबांची लवकर वाफ होते. असे झाल्याने ते व्हायरसचा भाग मागेच ठेऊन जातात. नंतर ते दुसऱ्या एअरोसॉलबोरोबर एकत्र होतात. हे एअरोसॉल बोलणे, शिंकणे, खोकलल्याने अथवा श्वासाने सोडले गेलेले असतात. संशोधनाचे मुख्य लेखक लेई झाओ म्हणाले, हे अत्यंत छोटे आहेत. सर्वसाधारणपणे, 10 मायक्रॉनपेक्षाही छोटे आहेत. हे तासंतास हवेत राहतात. यामुळे श्वसनाच्या माध्यमाने हे मानवाला संक्रमित करू शकतात.

काळजी घेणे आवश्यक -गरमीच्या दिवसांत एअरोसॉल ट्रान्समिशन अधिक धोकादायक असते, तर थंडीच्या दिवसांत थेंब. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण जेथे राहतो, तेथील तापमान आणि हवामानाप्रमाणे आपल्याला आपला बचाव करावा लागेल. जेणे करून व्हायरसच्या पसरण्याला आळा घालता येईल. थंड आणि गरम खोलीत सोशल डिस्टंसिंग अधिक असायला हवे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारत