"थंडीच्या दिवसांत आणखी वेगाने पसरणार कोरोना, 6 फुटांचं अंतरही ठरेल कुचकामी!"

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 15, 2020 06:21 PM2020-10-15T18:21:51+5:302020-10-15T18:28:53+5:30

या अहवालांत सांगण्यात आले आहे, की सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही. आतापर्यंत जगभरात कोरोनाने जवळपास 11 लाख लोकांचा बळी घेतला आहे.

Coronavirus might spread rapidly in winters and current social distancing might not be sufficient says new research | "थंडीच्या दिवसांत आणखी वेगाने पसरणार कोरोना, 6 फुटांचं अंतरही ठरेल कुचकामी!"

"थंडीच्या दिवसांत आणखी वेगाने पसरणार कोरोना, 6 फुटांचं अंतरही ठरेल कुचकामी!"

Next
ठळक मुद्देजगभरात कोरोनाने जवळपास 11 लाख लोकांचा बळी घेतला आहे. सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही.घर आणि इमारतीत वॉक-इन फ्रिज आणि कूलर अथवा जेथे तापमान कमी आणि आर्द्रता अधिक असते, अशा ठिकाणी हे थेंब 6 मीटरपर्यंत (19.7 फूट) जाऊ शकतात.

लॉस ऐन्जिलिस - कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली तेव्हा, उन्हाळा येताच अथवा गरमीच्या दिवसांत कोरोना नष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, तसे झाले नाही आणि आता जगभरात कोरोनाने जवळपास 11 लाख लोकांचा बळी घेतला आहे. हा व्हायरस एअरोसॉल (Aerosol) पार्टिकल्सच्या माध्यमाने गरमीच्या दिवसांत पसरत होता. आता श्वसन क्रीयेद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या माध्यमाने (Respiratory droplets) थंडीच्या दिवसांत तो पसरण्याचा वेग अधिक वाढेल. या थेंबांच्या संपर्कात आल्याने कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता एका ताज्या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. हे संशोधन Nano Letters जर्नलने प्रसिद्ध केले आहे.

6 फुटांचे अंतर पुरेसे नाही -
या अहवालांत सांगण्यात आले आहे, की सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही. या संशोधनातील एक संशोधक यानयिंग झू यांनी सांगितले, की हे थेंब सहा फुटांपेक्षाही अधिक दूर जातात हे त्यांच्या संशोधनातील अधिकांश प्रकरणांत दिसून आले आहे. एवढे अंतर अमेरिकेच्या CDCने (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. 

थंड ठिकाणी धोका अधिक -
घर आणि इमारतीत वॉक-इन फ्रिज आणि कूलर अथवा जेथे तापमान कमी आणि आर्द्रता अधिक असते, अशा ठिकाणी हे थेंब 6 मीटरपर्यंत (19.7 फूट) जाऊ शकतात. यानंतर ते जमिनीवर पडतात. अशात, हा व्हायरस काही मिनिटांपासून ते एक दिवसापर्यंत संक्रमक होऊ शकतो, असे झू म्हणाले.

थेंब व्हायरस पसरवतात -
गरमीच्या दिवसांत अथवा कोरड्या ठिकाणी या थेंबांची लवकर वाफ होते. असे झाल्याने ते व्हायरसचा भाग मागेच ठेऊन जातात. नंतर ते दुसऱ्या एअरोसॉलबोरोबर एकत्र होतात. हे एअरोसॉल बोलणे, शिंकणे, खोकलल्याने अथवा श्वासाने सोडले गेलेले असतात. संशोधनाचे मुख्य लेखक लेई झाओ म्हणाले, हे अत्यंत छोटे आहेत. सर्वसाधारणपणे, 10 मायक्रॉनपेक्षाही छोटे आहेत. हे तासंतास हवेत राहतात. यामुळे श्वसनाच्या माध्यमाने हे मानवाला संक्रमित करू शकतात.

काळजी घेणे आवश्यक -
गरमीच्या दिवसांत एअरोसॉल ट्रान्समिशन अधिक धोकादायक असते, तर थंडीच्या दिवसांत थेंब. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण जेथे राहतो, तेथील तापमान आणि हवामानाप्रमाणे आपल्याला आपला बचाव करावा लागेल. जेणे करून व्हायरसच्या पसरण्याला आळा घालता येईल. थंड आणि गरम खोलीत सोशल डिस्टंसिंग अधिक असायला हवे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Web Title: Coronavirus might spread rapidly in winters and current social distancing might not be sufficient says new research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.