Coronavirus : इम्यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेताना घ्या काळजी, 'ही' 5 लक्षणे दिसली तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:43 PM2020-06-23T12:43:02+5:302020-06-23T12:52:42+5:30

आयुर्वेदिक औषधांचे देखील साइड इफेक्ट्स असतात. आयुर्वेदिक औषधे नेहमी वातावरण, आरोग्य, वय आणि स्थिती बघून दिलं जातं.

Coronavirus : Immunity boosting ayurvedic decoction or kadha side effects | Coronavirus : इम्यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेताना घ्या काळजी, 'ही' 5 लक्षणे दिसली तर पडेल महागात!

Coronavirus : इम्यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेताना घ्या काळजी, 'ही' 5 लक्षणे दिसली तर पडेल महागात!

googlenewsNext

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी इम्यूनिटी काढ्याची चर्चा सध्या फारच होत आहे. कोरोनापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आलेला इम्यूनिटी वाढवणारा काढा घेण्याचा सल्ला दिला जात आहे. याचे अनेक फायदे असले तरी काही नुकसानही आहेत. आयुर्वेदिक औषधांचे देखील साइड इफेक्ट्स असतात. आयुर्वेदिक औषधे नेहमी वातावरण, आरोग्य, वय आणि स्थिती बघून दिलं जातं. पण सध्या लोक कोणत्याही चार-पाच वस्तू एकत्र करून काढा बनवून पित आहेत. पण अशात जर काढ्याचं सेवन तुमच्या आरोग्यानुसार किंवा वयानुसार चुकीच्या पद्धतीने केलं गेलं तर नुकसानही होऊ शकतं.

ही लक्षणे दिसली तर लगेच बंद करा

जर एखादी व्यक्ती इम्यूनिटी वाढवण्यासाठी आयुष मंत्रालायने सांगितलेला किंवा इतरही कुणी सांगितलेला काढा नियमित सेवन करत असेल आणि त्यांना खालील 5 लक्षणे दिसली तर त्यांना वेळीच काढा बंद करण्यास सांगा.

- नाकातून रक्त येणे

- तोंडात फोड येणे

- पोटात जळजळ किंवा पोटदुखी

- लघवी करताना जळजळ होणे

- अपचनाची समस्या होणे किंवा पातळ संडास होणे

कसं होतं या काढ्याने नुकसान?

इम्यूनिटी वाढवणाऱ्या आयुर्वेदिक काढ्यात सामान्यपणे काळे मिरे, सूंठ, दालचीनी, गिलोय, हळद, अश्वगंधा, लवंग, वेलची अशा औषधींचा वापर केला जातो. यातील बऱ्याच गोष्टी गरम असतात. त्यामुळे काढ्याच्या प्रमाणाकडे लक्ष न देता भरपूर सेवन केला तर शरीरात उष्णता वाढू शकते आणि वरील लक्षणे दिसू लागतात. आयुर्वेदिक काढा योग्य प्रमाणात सेवन केला तरच फायदेशीर ठरतो नाही तर त्यानेही नुकसान होतं. अनेकजण कोरोना घाबरून जास्त काढा सेवन करतात. जे चुकीचं आहे.

काढ्याच्या प्रमाणाकडे द्या लक्ष

इम्यूनिटी वाढवण्यासाठी तुम्ही आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आलेल्या काढ्याचच सेवन करा. याचं सेवन करत असताना औषधांच्या सांगितलेल्या प्रमाणाकडे लक्ष द्या. जर तुम्हाला वरील लक्षणे दिसत असतील तर सूंठ, काळे मिरे, अश्वगंधा आणि दालचीनीचं प्रमाण कमी करा. त्याऐवजी वेलची, ज्येष्ठमध यांचं प्रमाण वाढवा. हा काढा सेवन केल्यावर तुम्हाला काही त्रास होत असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानुसारत याचं सेवन करावं.

वात आणि पित्ताची समस्या असेल तर..

सामान्यपणे वर सांगण्यात आलेल्या औषधांपासून तयार काढा खोकला ठीक करतो. त्यामुळे खोकला असलेल्या लोकांसाठी हा काढा फायदेशी आहेच. पण ज्यांना वात किंवा पित्तांची समस्या आहे, त्यांनी हा काढा सेवन करताना विशेष काळजी घ्यावी. गरम पदार्थ त्यात जास्त टाकू नये. 

Coronavirus : कोरोनाची सामान्य लक्षणं अचानक कशी गंभीर होतात? 

CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांसाठी रेमडिसिव्हिर ठरेल गेमचेंजर

Web Title: Coronavirus : Immunity boosting ayurvedic decoction or kadha side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.