Coronavirus: ‘आरोग्य संदेश’ मिठाई वाढवणार रोगप्रतिकारशक्ती; कोरोना विषाणूशी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:12 AM2020-06-30T01:12:59+5:302020-06-30T10:51:37+5:30

कोरोनाला दूर ठेवणार दूध : गुणकारी मध, तुळशीचा होणार प्रभावी वापर

Coronavirus: ‘Health Message’ Sweet Boosts Immunity; Help to Fight against virus | Coronavirus: ‘आरोग्य संदेश’ मिठाई वाढवणार रोगप्रतिकारशक्ती; कोरोना विषाणूशी लढणार

Coronavirus: ‘आरोग्य संदेश’ मिठाई वाढवणार रोगप्रतिकारशक्ती; कोरोना विषाणूशी लढणार

Next

कोलकाता : कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अत्यंत गुणकारी अशा मधाचा वापर केला जाणार आहे. बंगाल टायगरसाठी प्रसिद्ध असलेल्या सुंदरबनातील मध वापरून कोरोनाला दूर ठेवू शकणारी ‘आरोग्य संदेश’ मिठाई तयार करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार सज्ज आहे.

मधाला आयुर्वेदामध्ये मोठे महत्त्व आहे. मध हा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी गुणकारी असतो. याच गुणधर्माचा वापर करून बंगाल सरकार ‘आरोग्य संदेश’ हे इम्युनिटी बुस्टर बाजारात आणणार आहे. दुधापासून बनविलेल्या चीजमध्ये सुंदरबनातील मध आणि तुळशीच्या पानांचा रस मिसळून ही मिठाई तयार करणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे, ‘आरोग्य संदेश’मध्ये स्वीट मार्टमधील अन्य मिठायांसारखा कोणत्याही प्रकारचा कृत्रिम स्वाद नसेल. ही मिठाई रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरेल, पण तिच्याकडे औषध म्हणून पाहू नये, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सुंदरबनचे मंत्री मंटुराम पाखिरा यांनी सांगितले की, संदेश मिठाईसाठी वापरण्यात येणारा मध हा सुंदरबनमधील पिर्खली, झार्खली आणि अन्य भागातून गोळा केला जाणार आहे. हा मध वैज्ञानिक पद्धतीने साठविला जाणार आहे.

विश्वासार्ह इम्युनिटी बूस्टर!
‘आरोग्य संदेश’ पुढील दोन महिन्यांमध्ये बाजारात येणार असून, याची किंमतही सामान्य माणसांना परवडेल अशी ठेवण्यात येणार आहे. याआधी कोलकाता येथील मिठाई विक्रेत्यांच्या एका प्रतिष्ठित संघटनेने ‘इम्युनिटी संदेश’ नावाची मिठाई बाजारात आणली होती. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक सत्त्व असल्याचा दावा त्यांनी केला होता. यामध्ये हळद, तुळस, केशर, वेलची आणि मध असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता सरकारनेच ‘आरोग्य संदेश’ची भेट देण्याचे ठरवल्यामुळे नागरिकांना विश्वासार्ह इम्युनिटी बूस्टर मिळू शकेल, अशी आशा व्यक्त होतेय.

कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. अशातच बाजारात सध्या ही खास मिठाई आणण्यात येणार आहे. कोरोनाशी लढण्यासाठी खास मिठाई मदत करणार असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामधील एका मिठाई विक्रेत्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल अशी मिठाई काही दिवसांपूर्वी तयार केली होती. 11 हर्ब्सपासून 'संदेश' नावाची खास मिठाई तयार करण्यात आली. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा दावा मिठाई विक्रेत्याने केला होता. 

लोकांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं हे या काळात अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच अशा पद्धतीची मिठाई तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संदेश मिठाईत तुळस, हळद, वेलची, जायफळ, आलं, काळी मिरी, जिरं, तमालपत्र अशा हर्ब्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये साखर किंवा गूळ वापरलेला नाही. तर मधाचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून मिठाईत वापरलेल्या हर्ब्समधील पोषक घटक कायम राहतील. संदेश मिठाईही मिष्टी दही, रसगुल्ल्याप्रमाणेच प्रसिद्ध अशी बंगाली मिठाई आहे. 

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा
प्रभाव नाही.)
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: ‘Health Message’ Sweet Boosts Immunity; Help to Fight against virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app