कफ पातळ करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर अडुळसा; संक्रमणापासून राहता येईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:19 PM2020-06-26T18:19:54+5:302020-06-26T18:30:49+5:30

कोरोनाचं संक्रमण झाल्यास श्वसनविषयक समस्या उद्भवतात. 

CoronaVirus : Health malabar nut adulsa is beneficial to fight with coronavirus | कफ पातळ करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर अडुळसा; संक्रमणापासून राहता येईल दूर

कफ पातळ करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर अडुळसा; संक्रमणापासून राहता येईल दूर

googlenewsNext

कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचं संक्रमण झाल्यास श्वसनविषयक समस्या उद्भवतात. माय उपचारशी बोलताना डॉ. लक्ष्मीदत्ता शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार अडुळश्याचे झाड, पान आणि फुलांमध्ये औषधी गुणधर्म असतात. श्वासासंबंधी समस्या कमी करण्यासाठी अडुळसा फायदेशीर ठरू शकतो. 

कारण त्यामुळे छातीत साठून राहिलेले कफ पातळ होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अडुळश्याचे  गुणकारी फायदे सांगणार आहे. सध्या कोरोनाच्या माहामारीत सर्दी, ताप आल्यास लोकांना कोरोनाचं संक्रमण झाल्याची भीती वाटते. अशा स्थितीत तुम्ही आरोग्याची काळजी घेऊन स्वतःला आजारांपासून लांब ठेवू शकता. 

डोकेदुखीपासून आराम मिळतो

डोकेदुखीचा त्रास असेल तर असता डोक्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावला की, डोकेदुखी पूर्णपणे थांबते. अडुळशाच्या पानांचा नुसता रस निघत नाही. पाने शेकून रस काढला तर चांगला निघतो किंवा अडुळश्याच्या फुलांना सुकवून त्यांचे चुर्ण तयार करून गुळासोबत खाल्ल्यास आराम मिळेल.  

श्वसनाचे विकार दूर होतात

श्वासावरील विकारात अडुळशाच्या रसात मध आणि पिंपळी यांचे चाटण अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे श्वासांचे विकार बरे होण्यास मदत होते. दम लागणं कमी होते.

टीबीवर गुणकारी

अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठमधाचा तुकडा घालून पाव लिटर पाणी घालावे. काढा करून घ्यावा. हा काढा टीबीवर उत्तम आहे.

मासिक पाळीतील समस्या दूर होतात

मासिक पाळी अनियमित नसेल तर अडुळसा फायदेशीर ठरतो. त्यासाठी १० ग्राम अडुळसा, मुळा आणि गाजर ६ ग्राम अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. पाणी आटून कमी झाल्यास गॅस बंद करा. थंड करून या काढ्याचं सेवन करा. 

मुत्राविषयक आजार दूर होतात

ज्या लोकांना लघवी येण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागतो किंवा सतत लघवी लागते. अशी समस्या उद्भवत असेल त्यांनी कलिंगडाच्या बिया आणि अडुळश्याची पानं वाटून या चुरणाचे सेवन केल्यास समस्या दूर होईल.

Coronavirus : वैज्ञानिकांनी सांगितले 'ही' आहेत कोरोनाची दोन मु्ख्य लक्षणे, दिसताच लगेच डॉक्टरांना करा संपर्क!

CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार

Web Title: CoronaVirus : Health malabar nut adulsa is beneficial to fight with coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.