शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

चिंताजनक! WHO चा सर्व देशांना इशारा; कोरोना लसीच्या भरवशावर राहू नका, आपापली व्यवस्था पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 18:06 IST

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील देशांनी कोरोना व्हायरसच्या लसीसाठी वाट पाहू नये.

कोरोनाची लस तयार करण्यासाठी इतर देशांसह भारतातील सरकारही सक्रिय झाले आहे. देशातील २ ते ३ लसींच्या चाचण्या सुरु आहेत. याव्यतिरिक्त एकूण मिळून पाच कंपन्यांचे कोरोनाचे उपचार शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका, ब्रिटेन, युरोपियन युनियन यांप्रमाणे भारतानंही  लस निर्मीती करत असलेल्या काही कंपन्याशी करार केला आहे. सोमवारी कोरोनाच्या लसीच्या  विकासासाठी काम पाहत असलेल्या तज्ज्ञांच्या गटाची दिग्गज फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांनी भेट घेतली. या  बैठकीदरम्यान  ५ कंपन्यांना रोडमॅप तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील देशांनी कोरोना व्हायरसच्या लसीसाठी वाट पाहू नये. WHO च्या पश्चिमी देशातील रिजनल डायरेक्टर ताकेशी कासई यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच देशांनी कोविड १९ शी लढण्यासाठी तयार असायला हवं. कोरोनाच्या लसीवर अवलंबून राहू नका. सुरूवातीला जास्त मागणी असल्यामुळे सगळ्या देशात लस उपलब्ध होऊ शकणार नाही. 

सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार ताकेशी यांनी सांगितले की, जोपर्यंत कोरोनापासून सगळ्या देशांचा बचाव होत नाही. तोपर्यंत कोणताही देश सुरक्षित नाही. त्यासाठी कोरोनाशी लढण्यासाठी  तयारी ठेवणं आवश्यक आहे. फक्त लसीवर अवलंबून राहिल्यानं कोरोना कमी होणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बैठकीनंतर एका तज्ज्ञांच्या गटाशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की तज्ज्ञ कोरोनाची लस तयार करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. त्यासाठी उत्पादन, वितरण आणि किमतीवर चर्चा सुरू आहेत. 

दरम्यान  जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार २० ते ५० वर्ष वयोगटातील लोकांनी जीवघेणा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरवला आहे. पश्चिमी देशातील कोरोना संक्रमणाबाबत बोलातना WHO चे रीजनल डायरेक्टर डॉ. ताकेशी कासाई यांनी सांगितले की, २०, ३०, आणि ४० या वयोगटातील लोकांमार्फत कोरोना वेगानं पसरलं आहे. यातील जास्तीत जास्त लोकांना ते कोरोना संक्रमित असल्याची कल्पनासुद्धा नाही.डॉ. तकेशी कासाई यांनी सांगितले की, २० ते ५० या वयोगटातील लोकांकडून कोरोनाचं संक्रमण पसरलं जात आहे. दीर्घकाळ आजारी असलेले लोक, वृद्ध व्यक्ती, गर्दीची ठिकाणं आणि अंडर-रिजर्व्ड एरियामध्ये लोकांसाठी व्हायरस धोकादायक ठरू शकतो.  

WHO च्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, फिलिपींस आणि जपान या देशांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले जास्तीत जास्त लोक संक्रमित झाले आहेत. या लोकांमध्ये व्हायरसची लक्षणं दिसून येत आहेत. तर काहींमध्ये लक्षणं नसतानाही कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्यातून नकळतपणे एकमेकांपर्यंत संक्रमण पोहोचत आहे.

हे पण वाचा-

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित

'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना