भारतासह जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय अनेक उपाययोजना कोरोना व्हायरसला  रोखण्यासाठी केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत.

अनेक ठिकाणी शासनाकडून  सुविधा केंद्र निर्माण करण्यात आली आहे.  कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी हॉस्टेल, हॉटेल, शाळा, स्टेडीयम, लॉज  या सार्वजनीक ठिकाणी यांची स्थापना केली जात आहे. सुविधा केंद्रावर ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण जाणवत असतील म्हणजेच श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा अन्य शारीरीक लक्षणं दिसून येत असतील तर रुग्णांची व्यवस्था केली जात आहे.

या व्यतिरिक्त कोरोना व्हायरस केअर सेंटरसह 24x7 ऑक्सिजन सपोर्ट आणि एम्बूलंससेवा पुरवली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे प्रवेशक्षेत्र असायला हवेत. हे हॉस्पिटल्स अशा लोकांसाठी असतील त्यांना निमोनिया किंवा  किंवा गंभीर स्वरूपाची लक्षणं आहेत. शासनाने केलेल्या नियोजनानुसार सुरुवातीला लक्षणांची तपासणी करून रुग्णांना वेगवेगळं ठेवण्यात येतं आहे. 

त्यासोबतच कोरोनाला हरवण्यासाठी वैयक्त्तीक पातळीवर काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मास्कचा वापर करा. कोणत्याही सार्वजनीक हात लावण्याच्या आधी हात सॅनिटाईज करून घ्या. यापासून बचाव करण्यासाठी जर तुमच्या जवळ कुणी शिंकत असेल किंवा खोकत असेल तर घरी आल्यावर सर्वातआधी कपडे बदलावे आणि हे कपडे वेगळे ठेवावे.जर शक्य असेल तर कपडे कोमट पाण्यात भिजवून धुवावे. कुठेही स्पर्श केला तर 20 ते 30 सेकंद चांगले हात धुवावे. 

Web Title: Coronavirus : Government new sop for managing suspect confirmed corona myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.