Coronavirus: कोरोनातून आत्ताच बरे झालात, मग तातडीनं तुमचा टूथब्रश फेकून द्या; तज्त्रांनी का दिलाय हा सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:27 PM2021-05-08T17:27:49+5:302021-05-08T17:29:26+5:30

भारतात कोरोना व्हायरस पूर्वीपेक्षा धोकादायक ठरत आहे. आता हे स्पष्ट झालं आहे की, एकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो.

Coronavirus: Experts Recommend Change Your Toothbrush After Recovering From Covid-19 | Coronavirus: कोरोनातून आत्ताच बरे झालात, मग तातडीनं तुमचा टूथब्रश फेकून द्या; तज्त्रांनी का दिलाय हा सल्ला?

Coronavirus: कोरोनातून आत्ताच बरे झालात, मग तातडीनं तुमचा टूथब्रश फेकून द्या; तज्त्रांनी का दिलाय हा सल्ला?

Next
ठळक मुद्देलसीकरण एक उपाय म्हणून प्रभावी ठरतोय पण तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही परिस्थिती सुरक्षेची १०० टक्के गॅरेंटी देऊ शकत नाही. जे रुग्ण अलीकडेच कोरोनातून बरे होऊन घरी परतलेत त्यांनी तात्काळ नवीन टूथब्रशचा वापर करायला हवा.कोविड १९ पासून वाचल्यानंतर तोंडाची स्वच्छता, टूथब्रश, जीभेची स्वच्छता याचे महत्व जाणून घ्या

जर तुम्ही अलीकडेच कोविड १९ च्या आजारातून बरे झाले असाल तर तुम्हाला पहिल्यापेक्षा अधिक सतर्क राहायला हवं. अनेक लोक तुम्हाला बचावासाठी खूप साऱ्या सूचना देतील. परंतु आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते कदाचित तुम्ही खूप कमी ऐकलं असेल. आता तुम्हाला तुमचा टूथब्रश बदलायला हवा. ऐकून थोडा वेगळं वाटलं का? पण कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.

भारतात कोरोना व्हायरस पूर्वीपेक्षा धोकादायक ठरत आहे. आता हे स्पष्ट झालं आहे की, एकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो. लसीकरण एक उपाय म्हणून प्रभावी ठरतोय पण तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही परिस्थिती सुरक्षेची १०० टक्के गॅरेंटी देऊ शकत नाही. त्यासाठी संक्रमणावेळी आणि त्यातून बरे झाल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे.

टूथब्रश किती दिवसांनी बदलायचा?

लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे डेंटल सर्जरी विभागाचे एचओडी डॉ. प्रवीण मेहरा सांगतात की, जे रुग्ण अलीकडेच कोरोनातून बरे होऊन घरी परतलेत त्यांनी तात्काळ नवीन टूथब्रशचा वापर करायला हवा. त्यामुळे संबंधित व्यक्ती दुसऱ्यांना कोरोना संक्रमित होण्याची शक्यता कमी राहते. त्याचसोबत घरातील इतर सदस्यही संक्रमणापासून वाचू शकतात जे एकच वॉशरूम वापरत असतात. आकाश हेल्थकेअरचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉ. भमिका मदान यांनी सांगितले की, मी या गोष्टीशी सहमत आहे. कारण सर्दी, खोकला आणि तापातून बरे झालेल्यांनी टूथब्रश बदलणं फायद्याचं आहे. जर तुम्हाला कोविड १९ झाला असेल लक्षणं दिसल्यानंतर २० दिवसानंतर टूथब्रश आणि टंग क्लीनर बदलायला हवं.

त्याचसोबत टूथब्रशवर काही काळानंतर बॅक्टरिया निर्माण करतं. माऊथवॉश उपलब्ध नाही तर गरम पाण्याने गुळण्या करा. त्याशिवाय दिवसातून २ वेळा बार ओरल हायजीन ठेवा आणि ब्रश करा. कोविड १९ पासून वाचल्यानंतर तोंडाची स्वच्छता, टूथब्रश, जीभेची स्वच्छता याचे महत्व जाणून घ्या. WHO नुसार व्हायरस संक्रमित व्यक्ती शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर त्याच्या तोंडाच्या वाटे छोटे ड्राप पसरतात. दुषित ठिकाणी हात लावल्यानंतरही कोरोना संक्रमित होऊ शकतो.

यावर्षी जानेवारी महिन्यात ब्राझीलच्या संशोधकांनी कोविड १९ च्या चर्चेवर तोंडाच्या स्वच्छतेचा प्रभाव समजून घेण्यासाठी अभ्यास केला. त्यांनी केलेल्या रिपोर्टमध्ये टूथब्रश बॅक्टेरिया फ्री ठेवण्यासाठी ओरल हायजीन ठेवणं गरजेचे आहे. त्यामुळे संक्रमण कमी होण्यास मदत होते. संक्रमित व्यक्ती दुसऱ्याला लगेच संक्रमित करतो. त्यासाठी आपण आवश्यक ती काळजी घेणं गरजेचे आहे. जेणेकरून आपण स्वत: आणि दुसरेही सुरक्षित राहू शकतात

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Experts Recommend Change Your Toothbrush After Recovering From Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app