CoronaVirus News: डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे; उलट ते दुधारी शस्त्र... समजून घ्या कसं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:56 AM2020-06-20T04:56:09+5:302020-06-20T04:56:24+5:30

डेक्झामिथॅझोन हे औषध आधीपासूनच कोरोना संसर्गावरील उपचारात वापरले जाते. जे रुग्ण गंभीर होतात, ज्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते अशांनाच दिले जाते.

CoronaVirus Dexamethasone is not a magic wand | CoronaVirus News: डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे; उलट ते दुधारी शस्त्र... समजून घ्या कसं!

CoronaVirus News: डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे; उलट ते दुधारी शस्त्र... समजून घ्या कसं!

Next

- डॉ. अमोल अन्नदाते

डेक्झामिथॅझोन हे औषध ‘कोविड-१९’ या महामारीवर रामबाण औषध ठरते आहे, अशा मथळ्याची बातमी एका परदेशी इंग्रजी वृत्तसमूहाने प्रकाशित केली. ती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण यातून असा अर्थ कोणीही काढू नये की कोरोना झाला की, लगेच डेक्झा हे औषध द्यायचे... तसेच हे औषध दिले की लगेचच आजार बरा होणार. हे औषध मग प्रतिबंधासाठीही वापरता येईल, असाही अनेकांचा गैरसमज होण्याच्ची शक्यता आहे.

डेक्झामिथॅझोन हे औषध आधीपासूनच कोरोना संसर्गावरील उपचारात वापरले जाते. जे रुग्ण गंभीर होतात, ज्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते अशांनाच दिले जाते. काही रुग्णांमध्ये प्रतिकारशक्तीचा व कुठल्याही विषाणू संसर्ग झाल्यास शरीरात आवश्यक प्रमाणात निर्माण होणारे सायटोकाइन हा घटक जास्त प्रमाणात निर्माण होतो व या घटकाचे वादळ येते, ज्याला सायटोकाइन स्टॉर्म असे म्हणतात. यासाठी डेक्झामिथॅझोन किंवा काही वेळा मिथाइल प्रीडनीसेलोन हे स्टेरॉइड वापरले जातात. पण लक्षणविरहीत व सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचे लक्षण असलेल्या रुग्णांना याची गरज नसते.

फक्त डेक्झामिथॅझोनक नव्हे इतर अनेक गोष्टी या ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी वापरल्या जातात... ज्या जीव वाचवण्यास उपयोगी ठरू शकतात. म्हणून डेक्झामिथॅझोन हे उपयोगी पडत असले तरी ते रामबाण उपाय आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डेक्झामिथॅझोन इतर स्टेरॉइड हे बºयाचदा स्वैरपणे व गरज नसताना वापरले जाते. पण ते एक दुधारी शस्त्र आहे. गरज असेल तेव्हा वापरले तर जीव वाचवणारे ठरू शकते व गरज नसताना वापरल्यास गुंतागुंत वाढवणारे ठरू शकते. या आजाराच्या बाबतीत हे खरे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व ठरलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणेच वापरले गेले पाहिजे. 

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: CoronaVirus Dexamethasone is not a magic wand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.