शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

Coronavirus Death : भयावह! कोरोना संक्रमिताचे अंत्यसंस्कार करण्यासाठी १५० लोक पोहोचले; गावात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 15:07 IST

Coronavirus Death : नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे.

देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. तरीही लोक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे.

लोकांच्या निष्काळजीपणामुळे मोठं नुकसान झाल्याची घटना राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातील खीरवा गावात कोरोनामुळे मृत झालेल्या एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जवळपास १५० लोकांनी गर्दी केली. आता  २१ दिवसांच्या आत जवळपास २१ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. 

राजस्थानात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. राज्यातील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तहसीलच्या खीरवा गावात गेल्या २१ दिवसांत २१ हून अधिक लोकांच्या मृत्यूमुळे लोक घाबरले आहेत. यानंतर राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके खेराव गावात पोहोचली आहेत. तथापि, अधिकाऱ्यांचे  म्हणणे आहे की एप्रिल ते मे दरम्यान गावात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केवळ चार मृत्यू झाले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खीरवा गावात कोरोना संक्रमणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्ययात्रेसाठी जवळपास १५० लोक जमा झाले. यादरम्यान कोरोना प्रोटोकॉल्सचे पालन करण्यात आलं नाही. या माणसाला ज्या प्लास्टीकच्या पिशवीत आणलं होतं. त्यावेळी अनेकांनी स्पर्शदेखील केला. 

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

लक्ष्मणगडचे अधिकारी कलराज मीणा यांनी सांगितले की, ''२१ पैकी फक्त ४ लोकांचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झाला आहे.  मृतांमध्ये जास्त वयाच्या लोकांचा समावेश आहे. तरीसुद्धा आम्ही ज्या कुटुंबातील लोक वारले आहेत. त्यांच्या  १४७ नमुने घेतले आहेत. जेणेकरून कोरोना व्हायरसचं सामुदायिक संक्रमण झालं आहे की नाही याबबत माहिती मिळवता येऊ शकेल. ''

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

प्रशासनाकडून गावाला कोरोनामुक्त बनवण्यासाठी  प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या आजारपणाबाबत माहिती घेऊन त्यांना सहकार्य केलं आहे. याबाबत सीकरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय चौधरी यांनी सांगितले की, या संदर्भात स्थानिक संघाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल मिळाल्यानंतरच माहिती देता येऊ शकते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू