शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दिलासादायक! कोरोनाच्या 'या' चार लसी माकडांवरील चाचणीदरम्यान ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 11:48 IST

CoronaVirus News & Latest Updates : भारतात कोविड १९ वर मात करण्यासाठी स्वदेशी लस तयार करण्यावर  भर दिला जात आहे.

कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी लस हा एकमेव उपाय सध्या दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात हर्ड इम्युनिटीची स्थिती इतक्यात निर्माण होणार नाही. त्यासाठी लसीमार्फत इम्युनायजेशन करावे लागेल. जगभरातील देशांमधील जवळपास २५ लसी मानवी परिक्षणाच्या जवळ येऊन पोहोचल्या आहेत. भारतात कोविड १९ वर मात करण्यासाठी स्वदेशी लस तयार करण्यावर  भर दिला जात आहे.

दरम्यान नेदरलँड आणि अमेरिकेत  तयार होत असलेल्या लसीला मोठं यश मिळालं आहे. या लसीच्या सिंगल डोसने माकडांमधील कोरोनाचं संक्रमण पूर्णपणे रोखण्यास मदत झाली आहे. लसीकरण केल्यानंतर जवळपास सगळ्याच माकडांमध्ये एँटीबॉडीज तयार झाल्या होत्या. याशिवाय माकडांच्या फुफ्फुसांवरही इन्फेक्शन झालं नव्हतं.  सहापैकी ५ माकडांच्या नाकातील स्वॅबमध्येही व्हायरसचं संक्रमण दिसून आलं नाही. 

अमेरिका, ब्रिटेन आणि चीन या तिन्ही देशांच्या लसी सगळ्यात पुढे आहेत. या लसी चाचणीच्या एडवांस स्टेजमध्ये आहेत. कंपनी एक्स्ट्राजेनका आणि अमेरिकन कंपनी मॉडर्नाची लस अनेक देशांमध्ये तयार होऊ शकते. या दोन कंपन्यानी अनेक देशांसोबत लसीचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. 'नेचर' जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनका  या लसी माकडांना कोरोना विषाणूंपासून वाचवण्यासाठी यशस्वी ठरल्या आहेत.  तसंच जॉनसन एँड जॉनसन या कंपनीच्या लसीचेही चांगले परिणाम दिसून येत आहेत.

आतापर्यत एकूण चार लसींचे माकडांवरील परिक्षणाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजच्या लसीचे परिक्षण शेकडो लोकांवर सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने लहान समुहांवर परिक्षण करण्यात येत आहे. न्‍यूज एजेंसी एपीशी बोलताना प्राध्यापक डॉ. रॉबिन शॅटोक यांनी़ सांगितले की, सगळ्या लसींपैकी चाचणीदरम्यान कमीत कमी दोनतरी लसी अशा असतील ज्या परिणामकारक ठरतील.

दरम्यान कोरोनाच्या माहमारीतून बाहेर येण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. फायनंशियल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कंपनी मॉडर्ना इंक लस तयार केल्यानंतर एका कोर्ससाठी ३ हजार ७०० रुपयांपासून ४ हजार ५०० रुपयांपर्यंत खर्च वसूल करेल अशी योजना आखली जात आहे. फायजर कंपनी आणि बायोटेक कंपनीच्या तुलनेत मॉडर्ना लसीची किंमत खूप जास्त आहे. जवळपास ८०० रुपयांनी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या दोन डोससाठी जवळपास ३ हजार ७०० ते ४ हजार ५०० इतका खर्च लागू शकतो.

कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स