कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 10:44 AM2020-07-31T10:44:39+5:302020-07-31T10:54:23+5:30

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गुरूवारी इशारा दिला की, सध्या कोरोना व्हायरस वॅक्सीन तयार व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत जगाने यासोबत जगणं शिकलं पाहिजे.

World health organisation warns partying youngsters not to let down guard on covid-19 | कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!

कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!

Next

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गुरूवारी इशारा दिला की, सध्या कोरोना व्हायरस वॅक्सीन तयार व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत जगाने यासोबत जगणं शिकलं पाहिजे. WHO चे प्रमुख टेड्रॉस अडहॉनम गीब्रीएसुस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले की, जगाने कोरोना व्हायरससोबत जगणं शिकावं. तसेच त्यांनी इशारा दिला की, जर तरूण असा विचार करत असतील की, त्यांना व्हायरसचा धोका नाही. तर ते चुकीचा विचार करत आहेत. तरूणांचा संक्रमणाने मृत्यू तर होऊ शकतोच, सोबतच ते अनेक कमजोर लोकांपर्यंत व्हायरस पसरवण्याचं कामही करत आहेत.

टेड्रॉस म्हणाले की, 'आपण सर्वांनीच आता या व्हायरससोबत जगणं शिकलं पाहिजे. तसेच आपल्या आणि इतरांच्या जीवाची सुरक्षा करत जगण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे' त्यांनी अनेक देशांनी पुन्हा लागू केलेल्या नियमांची प्रशंसा केली. टेड्रॉस यांनी यावेळी  सौदी अरब सरकारचं कौतुक केलं. 

टेड्रॉस म्हणाले की, कोरोनाने तरूणांनाही धोका आहे. पण अनेक देशातील तरूण याला सामान्य संक्रमण मानत आहेत. आम्ही आधीही इशारा दिला होता आणि आता पुन्हा सांगत आहोत की, तरूणही या व्हायरसपासून बचावलेले नाहीत. तरूणही या व्हायरसने संक्रमित होऊ शकतात. त्यांचाही मृत्यू होऊ शकतो. WHO ने अमेरिका, ब्राझील, भारत, साउथ अफ्रिका आणि कोलंबियामध्ये बिघडलेल्या स्थितीबाबत चिंता व्यक्ती केली आहे.

दरम्यान, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेली वॅक्सीन किती फायदेशीर ठरेल किंवा नाही याबाबत आपल्याला पुढील वर्षीच कळेल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियो म्हणाले की, या व्हायरसचा व्यवहार फारच अनिश्चित आहे. त्यामुळे अशात यापासून बचाव करण्यासाठी वॅक्सीनचा एक डोस पुरेसा असेल की नाही हे आता सांगता येणार नाही. 

हे पण वाचा :

Coronavirus vaccine : सर्वातआधी कुणाला दिला जाईल कोरोना व्हायरस वॅक्सीनचा डोस?

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

Web Title: World health organisation warns partying youngsters not to let down guard on covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.