रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:52 PM2020-07-30T17:52:45+5:302020-07-30T18:02:25+5:30

FSSI नं रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहाराबाबत काही टिप्स दिल्या आहेत. अशा पदार्थांचे आहारात सेवन केल्यास आजारांपासून लांब राहता येऊ शकते.

Tips Given by fssi to help you boost your immune system to fight With corona virus | रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

Next

कोरोनाच्या माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती सुधारणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण कोविड१९ या आजारातून कोरोना रुग्ण सुखरूपपणे बाहेर येऊ शकतो. त्यासाठी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर इतर आजारांपासूनही लांब राहता येऊ शकतं. सध्या FSSI नं रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहाराबाबत काही टिप्स दिल्या आहेत. अशा पदार्थांचे आहारात सेवन केल्यास आजारांपासून लांब राहता येऊ शकते.

संत्री

 संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, कोलिन, कॅल्शिअम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी - 1 भरपूर प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये कमी कॅलरी आणि हाय फायबर रिच असल्याकारणाने वेट लॉससाठी फायदेशीर ठरतं. तसेच अनेक गुण असल्याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.

पपई

पपईमध्ये शक्तीशाली अ‍ॅन्टीऑक्सिडंट आढळून येतात. जसं कॅरोटिन्स, फ्लॅवोनॉएड्स, व्हिटॅमिन-सी इत्यादी. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी शरीरातं अनेक आजारांपासून रक्षण होतं.  पपईमध्ये डायजेस्टिव एंजाइम्ससारखं पपेन असतं, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये असलेलं फायबर शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. 

ढोबळी मिरची

पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते.  व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते. ढोबळी मिरची नाकातील वायुमार्ग साफ करते आणि बंद नाकामुळे होणारा त्रास कमी करण्यास  गुणकारी ठरते. 

लिंबू

लिंबू हे फळ त्वचेला आतून पोषण देऊन तुमच्या चेहऱ्यावर तेज आणते. लिंबूपाणी पिण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.  लिंबामुळे मलेरिया, कॉलरा, डिप्थेरिया, टायफॉईड व इतर जीवघेणे आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. दात दुखत असलेल्या ठिकाणी ताज्या लिंबाचा रस लावल्याने दुखणे थांबते. हिरड्यांवर लिंबाच्या रसाने मसाज केल्याने हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबतो. 

पेरू

व्हिटामीन्स आणि मिनरल्सचे प्रमुख स्त्रोत असलेले पेरू हे फळं आहे. तसंच पेरूच्या सेवनाने  शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अनेक आजारांपासून बचाव होण्यासाठी पेरूचा आहारात समावेश करावा.  सकाळी सकाळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे खूप फायद्याचे ठरते. जर तुमच्या तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पानं चावल्यास फायदेशीर ठरते.  मधूमेह, मोतीबिंदू, खोकला, हद्यविकाराच्या आणि वजन कमी होण्याच्या समस्येसाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरत असते. पेरू  कॉलेस्ट्रॉल कमी करून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून वाचवतो. 

कोरोनाच्या माहमारीविरुद्ध लढण्यासाठी WHO चं भारताला आवाहन, तज्ज्ञ म्हणाले की..... 

CoronaVirus News : कोरोनाबाबत सर्च करणं पडू शकतं महागात, मानसिक आरोग्य धोक्यात, व्हाल 'डूम स्क्रोलिंग'चे शिकार

Web Title: Tips Given by fssi to help you boost your immune system to fight With corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.