शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सावधान! नखांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग; डॉक्टरांकडून सावधगिरीचा इशारा, वाचा बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 12:16 IST

Coronavirus : कोरोना व्हायरसला वाढण्यापासून रोखण्यासाठी आपल्या लहान लहान सवयींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे.

कोरोना व्हायरसनं देशात गेल्या दीड वर्षापासून  धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत संसर्गापासून बचाव होण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लोकांकडून सरकारच्या  गाईडलाईन्सचे पालन होतानाही दिसून येत आहे. कोरोना व्हायरसला वाढण्यापासून रोखण्यासाठी आपल्या लहान लहान सवयींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. कारण खोकला, शिंकणे यांमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.

त्यासाठी  सरकारनं सॅनिटायजेशन आणि मास्क लावण्याचे आदेश दिले आहेत.  नखांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रवेश शरीरात होऊ शकतो का? याबाबत  डर्मेटोलॉजिस्ट डॉ. सुकृति शर्मा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

जर आपले नखं लांब असतील तर कोरोना आपल्या नखांवर चिकटू शकतो. सॅनिटायजरच्या वापरानंतर आणि हात धुतल्यानंतरही त्याचे कण नखांमध्ये राहतात. अन्न खाताना किंवा तोंडात हात घालताना हे कण  घशातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात.

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

कोरोना 125 नॅनोमीटर आहे. एखाद्या व्यक्तीला वारंवार नखं चावण्याची सवय असल्यास, या प्रकरणात, ते सहजपणे नखांभोवती लहान पट्ट्या गोळा करतात आणि जेव्हा आपण नखे चवता तेव्हा ते आपल्या शरीरात प्रवेश करते.

जेव्हा मुली मेनिक्यूर किंवा पेडीक्योर करतात.  तेव्हा क्युटिकल त्वचा देखील बाहेर येते. ज्यामुळे कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश होऊ शकतो.  

जे लोक वारंवार हात स्वच्छ करतात किंवा सॅनिटाईज करतात, त्यानंतर त्यांना त्यांच्या हातात आणि नखांमध्ये रेषा येऊ लागतात. या रेषांद्वारे, कोरोनाव्हायरस सहजपणे प्रवेश करतो आणि नंतर शरीरात पोहोचतो.  कृत्रिम नखांच्या माध्यमातूनदेखील कोरोनाव्हायरस शरीरात प्रवेश करू शकते.

नखांमधून होणारा कोरोनाचा प्रसार कसा रोखाल?

१) आपले नखे नेहमीच लहान ठेवा आणि वेळोवेळी त्यांना कापत राहा.

२) जेव्हा आपण हात धुता किंवा सॅनिटायजर वापरता तेव्हा सर्व प्रथम आपले नखं स्वच्छ करा आणि नखांच्या आतील त्वचा देखील स्वच्छ करा.

३) जर आपण नेल पॉलिश वापरत असाल तर 2 किंवा 3 दिवसात नेल पॉलिश बदला.

४) आपले हात मऊ राहण्यासाठी मॉईश्चराईजरचा वापर करा. आंघोळ करताना नेल ब्रशिंग वापरा.

५) दिवसातून एकदा आपले नखे कोमट पाण्याने धुवा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला