शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Covid-19 vaccine pill : दिलासादायक! आता कोरोनापासून बचाव करणं आणखी सोपं होणार; टॅबलेटमध्ये मिळू शकते लस

By manali.bagul | Published: February 26, 2021 9:03 PM

Corona Vaccine News & latest Updates : वैज्ञानिकांच्या टीमकडून कोरोना व्हायरसच्या लसीचा शोध सुरू आहे. जी फ्लूच्या आजारासाठी  उपयोगी असलेल्या नेजल स्प्रे प्रमाणे किंवा पोलिओच्या लसीकरणात उपयोगी ठरत असलेल्या टॅबलेटप्रमाणे असेल.

कोरोनाच्या माहामारी काळात इंजेक्शनला  घाबरत असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. लोकांना लवकरत लवकर कोरोना व्हायरसची  लस टॅबलेटच्या स्वरूपात मिळू शकते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी या संशोधनावर काम सुरू केले आहे. डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड आणि एक्सट्राजेनका लसीच्या मुख्य तज्ज्ञ सारा गिल्बर्ट यांनी आपल्या टीमसह इंजेक्शन फ्री लस देण्याचे काम सुरू केले आहे.

वैज्ञानिकांच्या टीमकडून कोरोना व्हायरसच्या लसीचा शोध सुरू आहे. जी फ्लूच्या आजारासाठी  उपयोगी असलेल्या नेजल स्प्रे प्रमाणे किंवा पोलिओच्या लसीकरणात उपयोगी ठरत असलेल्या टॅबलेटप्रमाणे असेल. ही फक्त इंजेक्शनची धास्ती असलेल्यांसाठी आनंदाची गोष्ट नाही तर संपूर्ण जगभरात लसीकरण अभियानाला यामुळे गती मिळणार आहे. याशिवाय इतर लसींप्रमाणे ठराविक तापमानात स्टोअरही करावं लागणार नाही.

प्राध्यापक गिल्बर्ट यांनी हाऊस ऑफ कॉमन्स एंण्ड टेक्नोलॉजी कमिटीशी बोलताना सांगितले की, ''टॅबेलट किंवा नेझल स्प्रे फुफ्फुसं गळाआणि नाकाच्या इम्यून सेलवर योग्यपद्धतीनं काम करतील. अनेक लसी अशा आहेत ज्या नेझल स्प्रे च्या स्वरूपात घेतल्या जातात. कोरोना व्हायरसच्या टॅबलेटच्या लसीच्या निर्मीतीसाठी प्रयत्न केले  जात आहेत. नेझल स्प्रे आणि टॅबलेट लस तयार करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.''

काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा 

सगळ्यात आधी या लसीच्या सुरक्षेची चाचणी करावी लागणार आहे. अमेरिकेत जानेवारीपासूनच या टॅबलेटचे क्लिनिकल ट्रायल  सुरू केले होते. ब्रिटनमध्ये लोकांवर नेझल स्प्रे लसीचे ट्रायल करण्यात आले होते. एनिमल स्टडीमध्ये करण्यात आलेल्या एका दाव्यानुसार सकारात्मक सुरक्षा डेटा मिळाल्यानंतर युके मेडिसिन्स एंड हेल्थकेअर प्रोडक्सट्सकडून  हिरवा कंदील  दाखवला  जाईल. 

उन्हाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढणार की कमी होणार?

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या कोविड टास्क फोर्स ऑपरेशन ग्रुपचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी कोरोनाच्या प्रसाराबाबत बोलताना सांगितले की, ''व्हायरसशी संबंधित सर्व आजार लाटांप्रमाणेच आहेत. त्यांचा हवामान किंवा काळाशी काही संबंध नाही. मागच्या वर्षी कोरोनानं जेव्हा मान वर काढली होती तेव्हा असं सांगितलं जात होतं की,  उन्हाळा सुरू होताच प्रसारामध्ये कमी येईल. मात्र, प्रत्यक्षात उलट घडले.''  यानंतर असं सांगितलं जात होतं, की हिवाळ्यात प्रकरणं वाढू शकतात, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे   या विषाणूचा उष्णता किंवा थंडीशी काहीही संबंध नाही. तो एका लाटेच्या रुपात पसरत आहे.

चिंताजनक! देशात समोर आला कोरोनाचा नवा स्ट्रेन; व्हायरसच्या जुन्या रुपापेक्षा वेगळी आहेत ७ लक्षणं

कोरोनाच्या संसर्गात पुन्हा वाढ होण्याचं आणखी एक कारण म्हणजे कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आणि लस आल्यामुळे लोकांनी काळजी घेणं सोडून देत सर्रास बाहेर फिरण्यास सुरुवात केली. लस घेण्यापूर्वी कोरोनामुळे कोणताही धोका उद्भवू शकत नाही असा विचार केल्यामुळे लोक घराच्या बाहेर जायला लागले ही बाब चिंताजनक असून कोरोनाच्या प्रसाराचे कारण ठरली आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या