शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Corona virus new strain found in mumbai : धोका वाढला! मुंबईत सापडला कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन; अधिक काळजी घ्यावी लागणार

By manali.bagul | Updated: March 4, 2021 16:25 IST

CoronaVirus News & Latest Updates : आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

संपूर्ण जगभरासह महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे.  पुणे,नागपूर अमरावती, वर्धा, हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. आतापर्यंत ब्रिटनसह इतर देशांमध्ये हा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती समोर येत होती. पण आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

मुंबईमध्ये ब्रिटनचा नवा कोरोना स्ट्रेन सापडला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या ४ वर पोहोचली आहे. ९० नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात हा स्ट्रेन सापडला आहे. जिनोम सिक्वेन्सिंगनंतर एका रुग्णामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला. मुंबईत आतापर्यंत यूके स्ट्रेनच्या 4 केसेस झाल्या आहेत. दिल्लीच्या प्रयोग शाळेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या 90 पैकी एका सँपलमध्ये ब्रिटनमधील कोरोनाचा नवास्ट्रेन आढळून आला आहे. आतापर्यंत संपूर्ण अहवाल आलेले नाहीत. 

 याआधीच आढळून आलेल्या कोरोना रुग्णांवर मुंबईत अंधेरीच्या सेवन हिल्स रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात होते.  ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेननं आतापर्यंत 50 देशांमध्ये हल्ला केला आहे. देशात १८७  केसेस सापडल्या आहेत. तर त्यापैकी १३ रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याचे दिसून आलं आहे. 

गेल्या  २४ तासात कोरोना रुग्णांची हादरवणारी आकेडवारी आली समोर

महाराष्ट्रात काल ९ हजार ८५५  कोरोना रुग्ण समोर आले असून यामुळे राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे ४२ लोकांना मृत्यू सामना करावा लागला आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा २.४०  टक्के आहे. राज्यात ६ हजार ५५९ कोरोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. यामुळे कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट ९३.७७ आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेसमध्ये ८२ हजार ३४३ एक्टिव्ह रुग्ण आहेत. 

पुण्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

पुण्यात  कोरोना रुग्णांमध्ये(Pune corona Cases)  कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात जवळपास १ हजार ७१४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनानं जनतेला मास्कचा वापर करण्याचे आवाहन केलं असून सरकारनं या गोष्टींना गांभीर्यानं घेतलं आहे. धक्कादायक! लस घेतल्यानंतर काही महिन्यातच महिलांच्या छातीत विकसित झाल्या सुजेच्या गाठी; तज्ज्ञ सांगतात की....

नागपुरात वाढतोय कोरोनाचा धोका

नागपुर (Nagpur Corona Cases) शहरात कोरोनाच्या केसेसमध्ये कमतरता आढळली असून  गेल्या २४ तासात १ हजार १५२ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर ६ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. शहरात आतापर्यंत ४ हजार ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  नागपूर शहरात एकूण रुग्णांची संख्या  ९ हजार २९५ आहे. सावधान! कोरोना संक्रमित लोकांनी चुकूनही करू नये या औषधाचं सेवन; WHO चा इशारा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईHealthआरोग्य