शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

Coronavirus: जागतिक पातळीवर कोरोना रुग्ण घटू लागले; आतापर्यंत १६ कोटींपैकी १४ कोटी बरे झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 7:01 AM

जगभरात आतापर्यंत १६ कोटी बाधितांपैकी १४ कोटी रुग्ण बरे झाले असून ३३ लाख ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातही रविवारी सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आढळून आली

ठळक मुद्देदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ११ हजार नवे रुग्ण आढळून आले. ६ ते ९ मे या कालावधीत देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांवर गेली होती. देशात गेल्या १२० दिवसांत १८.२२ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून जगाला विळखा घालून बसलेल्या कोरोना विषाणूची मगरमिठी आता सैलावू लागल्याचे संकेत आहेत. जागतिक स्तरावर कोरोनाबाधितांच्या संख्येत उतार जाणवू लागला असून ९ मे रोजी कोरोनाने बाधित होणाऱ्यांची दैनंदिन संख्या जगात ६ लाख ६५ हजार होती ती १५ मे रोजी ६ लाख ३४ हजारांपर्यंत खाली आली. 

जगभरात आतापर्यंत १६ कोटी बाधितांपैकी १४ कोटी रुग्ण बरे झाले असून ३३ लाख ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातही रविवारी सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आढळून आली. अमेरिकेत सध्या ३ कोटी ३६ लाख इतके कोरोनाचे रुग्ण असून, त्यातील २ कोटी ७० लाख रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्या देशात आतापर्यंत गेलेल्या कोरोना बळींचा आकडा सहा लाखांच्या नजीक पोहोचला आहे.

भारतातही लक्षणीय घटदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ११ हजार नवे रुग्ण आढळून आले. ६ ते ९ मे या कालावधीत देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांवर गेली होती. ७ मे रोजी ती ४ लाख १४ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, नंतर ही संख्या कमी होऊ लागली.

४.२५ कोटी लोकांना दोन्ही डोसदेशात गेल्या १२० दिवसांत १८.२२ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. त्यात १८ वर्षे वयावरील ४.२५ कोटी लोकांना कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये ६६.४१ लाख आरोग्य सेवक, ८१.८६ लाख कोरोना योद्धे व ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ९९.६६ लाख लोक व ६० वर्षांपुढील १.७८ कोटी लोकांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या