Coronavirus: ताप न येताही वृद्धांना होऊ शकतो कोरोना; कसं ओळखायचं? नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 03:08 PM2021-05-08T15:08:34+5:302021-05-08T15:09:39+5:30

केवळ ताप येणंच हे लक्षण मानून निरीक्षण केल्याने केवळ त्या वृद्ध व्यक्तीला जीवाचा धोका नसतो तर घरातील इतर सदस्यही संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे.

Coronavirus: can cause corona in the elderly without fever; How to recognize Revealed in new report | Coronavirus: ताप न येताही वृद्धांना होऊ शकतो कोरोना; कसं ओळखायचं? नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

Coronavirus: ताप न येताही वृद्धांना होऊ शकतो कोरोना; कसं ओळखायचं? नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेच्या वॉश्गिंटन स्टेट युनिवर्सिटीने कोरोनावर नवा शोध जारी केला आहे. गंभीररित्या कोरोना संक्रमित असलेल्या ३० टक्के वृद्धांमध्ये ताप आढळला नाही शरीरात आवश्यक ऑक्सिजनची पातळी आहे की नाही हे तपासण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट देशात वेगाने पसरत आहे. या लाटेत कोणाला ताप आला म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं मानलं जातं. युवकांवर ही बाब बऱ्याच अंशी खरी ठरली आहे. तर वृद्ध व्यक्तींबाबत काही वेगळा रिपोर्ट समोर आला आहे. नव्या संशोधनानुसार वृद्धांना कोरोना असल्यावर ताप येऊ शकतो हे आवश्यक नाही. मग वृद्धांमध्ये कोविड १९ संक्रमण कसं ओळखायचं? याचं उत्तर पल्स ऑक्सिमीटरचा वापर करून वारंवार त्यांची ऑक्सिजन पातळीवर नजर ठेवली जावं.

केवळ ताप येणंच हे लक्षण मानून निरीक्षण केल्याने केवळ त्या वृद्ध व्यक्तीला जीवाचा धोका नसतो तर घरातील इतर सदस्यही संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे. अमेरिकेच्या वॉश्गिंटन स्टेट युनिवर्सिटीने कोरोनावर नवा शोध जारी केला आहे. त्यानुसार, वृद्ध व्यक्तींच्या शरीराचं तापमान तपासण्याऐवजी पल्स ऑक्सिमीटरचा वापर जास्त फायदेशीर ठरत आहे. हा रिपोर्ट मेडिकल जर्नल फ्रंटियर्स इन मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. याला वॉश्गिंटन स्टेट युनिवर्सिटीचे कॅथरिन वान सोन आणि डेबोरा इती यांनी तयार केला आहे.

नव्या रिपोर्टनुसार, गंभीररित्या कोरोना संक्रमित असलेल्या ३० टक्के वृद्धांमध्ये ताप आढळला नाही किंवा कमी ताप दिसला. पण त्यांच्यात कोरोनाचे अन्य लक्षण थकवा, अंगदुखी, वास घेण्याची क्षमता कमी होणे असं आढळून आलं. त्यासाठी वैज्ञानिकांनी वृद्धांच्या प्रकरणात शरीरात आवश्यक ऑक्सिजनची पातळी आहे की नाही हे तपासण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणीने कोरोनाची पुष्टी केली जाऊ शकते.

ऑक्सिमीटर लावताना काय काळजी घ्याल?

ऑक्सिमीटरवर बोट ठेवताना हात आरामात ठेवा

ज्यांच्या बोटावर नेलपॉलिस असेल ती प्रथम काढा आणि ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवा

ऑक्सिजन पातळी वेळोवेळी तपासा आणि त्यांची नोंद ठेऊन बदल समजून घ्या

रिडिंग स्थिर होईपर्यंत ऑक्सिमीटर काढू नका

 

रिडिंगवर या गोष्टीचा परिणाम

कमकुवत ब्लड सर्क्युलेशन

त्वचेची जाडी

तंबाखूचा वापर

शरीरातील त्वचेवर डाग असणे

बोटावर शाई किंवा नेल पॉलिश असणे

त्वचेचे तापमान

Read in English

Web Title: Coronavirus: can cause corona in the elderly without fever; How to recognize Revealed in new report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.