Coronavirus: हर्ड इम्युनिटीसाठी आपण तयार आहोत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:00 AM2020-06-28T01:00:26+5:302020-06-28T01:00:38+5:30

भारतात एक लस बनत आहे. पण, तिच्या चाचण्या होण्याआधीच उत्पादन सुरू झाले आहे. त्यांना खात्री आहे, ती लस उपयोगी ठरणारच आणि इथेच ते अवैज्ञानिक होते.

Coronavirus: Are We Ready for Heard Immunity? | Coronavirus: हर्ड इम्युनिटीसाठी आपण तयार आहोत का?

Coronavirus: हर्ड इम्युनिटीसाठी आपण तयार आहोत का?

Next

धनंजय केशव केळकर

कामावर जायचेच आहे. पण, मग घरच्या कामांचे काय? आता काही विशेष हवे आहे, आपल्यासाठी. आपण कामावर जाणार मग घरकामांच्या लोकांनाही काम हवेच आहे ना! केंद्रीय आयुष मंत्रालयाने उपाय सुचवले आहेत. सात दिवसांचा आयुर्वेदिक घरच्याघरी करता येणारा काढा आणि तीन दिवसांचा अर्सेनिक अल्बम ३० चा कोर्स. अनेक राज्यांनी तो आधीच स्वीकारला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. गुजरातमध्ये संपर्कात येऊनही आयुष औषधे घेतलेल्या जवळपास सहा हजार लोकांना कोर्स केल्यावर बाधा झाली नाही.

मालेगावमध्ये नेमलेल्या धुळ्याच्या पोलीस पथकातील एकाच पोलिसाला बाधा झाली. पण, बाकीच्यांनी अर्सेनिक घेतल्यामुळे एकालाही बाधा झाली नाही. पण, इतर ठिकाणच्या पोलीस कंपन्यांतील ३० टक्क्यांवर पोलिसांना बाधा झाली, त्यांनी एचसीक्यूचे डोस घेतले होते, तरीही. कमांडर संजय पाटील आणि डॉ. जसवंत पाटील यांच्यामुळे हे घडून आले. हे दोन दिलासा देणारे परिणाम होते.अर्सेनिक अल्बम ३० चा डोस, एकाच औषधाचा, स्वस्त असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचारही झाला. पुढे मालेगाव आणि मुंबईतील धारावी येथे जवळजवळ सर्वांनी हे डोस घेतल्यावर परिस्थिती सुधारली. त्यानंतर धारावीत मृत्यूचे आणि नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले. अर्सेनिक वाटणे ही एक लोकचळवळच सुरू झाली.

आतापर्यंत मुंबई, पुणे येथे अधिकाधिक लोकांनी हा कोर्स केला आहे. अनेक सामान्य लोकांनी, सामाजिक संस्थांनी हे वाटले आहे. पण, आता त्यांचेही पैशांचे स्रोत आटत आहेत. आता लोकांनीच लोकप्रतिनिधींवर दडपण आणून, पैसे देऊन का होईना काढा किंवा अर्सेनिक उपलब्ध करून द्यावे, यासाठी पाठपुरावा करायला हवा. अर्सेनिकमुळे चिंता आणि भीती जाते. भीती हा मोठा अडसर या युद्धात होता. तसेच एचसीक्यूचे दुष्परिणामही त्याने जातात. हर्ड इम्युनिटीसाठी अर्सेनिकचा फायदा होऊ शकतो. कामावर जाणाऱ्या प्रत्येकाने तीन दिवसांचा कोर्स करून गेल्यास धोका खूपच कमी होईल. कामावर बोलावणाऱ्यांनीही आधी हा कोर्स करून मगच कामावर या, असे सांगितले, तरी कम्युनिटी स्प्रेड टाळता येईल. दरमहिन्याला किमान एकदा हा तीन दिवसांचा कोर्स केला, तर साथ लवकरच आटोक्यात यायला हरकत नाही. खरंतर, हे सगळे राज्य सरकारने करायला हवे होते. म्हणजे, काळाबाजार आणि तुटवडा टाळला गेला असता. अवघे १०-२० कोटी रुपये महाराष्ट्रासाठी पुरले असते.

भारतात एक लस बनत आहे. पण, तिच्या चाचण्या होण्याआधीच उत्पादन सुरू झाले आहे. त्यांना खात्री आहे, ती लस उपयोगी ठरणारच आणि इथेच ते अवैज्ञानिक होते. कुठलाही प्रयोग हा अलिप्त राहून करायचा असतो. हे होणारच म्हटले की, त्यात पूर्वग्रहाने चुका होतात. त्यामुळे अशा चाचण्यांना अर्थ उरत नाही. होम आयसोलेशनही करता येऊ शकते. राज्य सरकारनेही आयुष औषधांना मान्यता दिली. पाऊस सुरू होत असल्याने सर्दी, तापही येऊ शकतो. तरी आधी आयुष डॉक्टरांना भेटल्यास कारण नसतानाची भीती वाचेल. मधुमेह आदी व्याधी असणाऱ्यांनी, ज्येष्ठांनी बाहेर पडायची वेळ आलेली नाही. काळजी घ्या, काळजी करू नका.

उत्साह, हुरहूर, चिंता, भीती अशा संमिश्र भावनांनी महाराष्ट्र अनलॉकिंगला सामोरे गेला आहे. हे अपरिहार्यच होते. जेवढे लोक बाधित झाले, त्यातील सुरुवातीला दोन बरे झाले, तर एकाचा मृत्यू होत असे. ते प्रमाणही सुधारत सतरास एक इतके झाले आहे. काही दिवसांनी कोरोना म्हणजे सीक लिव्ह एवढेच राहील. अनलॉकसाठी हीच योग्य वेळ आहे. पण, हर्ड इम्युनिटीसाठी आपण तयार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकारशक्ती. मास्क, अंतर राखून असणे, हात धुणे... आता आपल्या अंगवळणी पडले आहे.

(लेखक संशोधक आहेत.)

Web Title: Coronavirus: Are We Ready for Heard Immunity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.