Covid Recovery: कोरोनातून बरे झाल्यावर जास्त भूक लागते का? अजिबात करू नका दुर्लक्ष कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 01:59 PM2021-05-15T13:59:58+5:302021-05-15T14:00:33+5:30

Coronavirus : कोरोना संक्रमणादरम्यान आणि त्यातून रिकव्हर झाल्यावर जास्तीत जास्त लोकांना भूक कमी झाल्याची समस्या बघायला मिळत आहे.

Coronavirus : Appetite or hunger increased after recovery from covid don't ignore this symptom | Covid Recovery: कोरोनातून बरे झाल्यावर जास्त भूक लागते का? अजिबात करू नका दुर्लक्ष कारण....

Covid Recovery: कोरोनातून बरे झाल्यावर जास्त भूक लागते का? अजिबात करू नका दुर्लक्ष कारण....

googlenewsNext

कोरोना व्हायरस (Coronavirus) लोकांच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव करत आहे. कुणाला डायबिटीसची (Diabetes) समस्या दिसत आहे तर कुणाला हृदयरोगाची (Heart Disease) समस्या. तर कुणात आणखी काही गंभीर आजार बघायला मिळत आहे. इतकंच नाही तर कोरोना संक्रमणादरम्यान आणि त्यातून रिकव्हर झाल्यावर जास्तीत जास्त लोकांना भूक कमी झाल्याची समस्या बघायला मिळत आहे. तर काही लोक असेही आहेत ज्यांची भूक संक्रमणादरम्यान किंवा कोरोनातून बरे झाल्यावर वाढली आहे. म्हणजे हे लोक अधिक जास्त खात आहेत.

कोरोना संक्रमणातून बरे झाल्यावर वाढली भूक

हेल्थ एक्सपर्ट आणि डॉक्टरांनुसार, जास्त काळ भूक वाढलेलीच राहत असेल तर हे डायबिटीस किंवा एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. नवभारत टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, कोरोना संक्रमणातून ठीक झाल्यावर जास्त भूक लागणे किंवा जास्त खाणं हाही एक आजार आहे. असं काही होत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा. (हे पण वाचा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका? एक्सपर्ट म्हणाले - घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण....)

लखनौच्या केजीएमयूमधील एका डॉक्टरांनुसार, कोरोना संक्रमणात जास्तीत जास्त रूग्णांची गंध घेण्याची टेस्टची क्षमता नष्ट होते. त्यामुळे ठीक झाल्यावर जेव्हा या दोन्ही समस्या दूर होतात तेव्हा रूग्णाचा मेंदू त्याला जास्त खाण्याचा संकेत देतो. २ ते ४ दिवस असं होत असेल तर ही सामान्य बाब आहे.

कमजोरीमुळे जास्त भूक लागते

भूक वाढण्याची समस्या कोरोनाच्या गंभीर रूग्णांमध्येच नाही तर कमी लक्षण असलेल्या किंवा लक्षण असलेल्या रूग्णांमध्ये बघायला मिळते. याचं कारण हे आहे की संक्रमणादरम्यान शरीर व्हायरससोबत लढतं, ज्यानंतर संक्रमण दूर झाल्यावर शरीराची कमजोरी वाढते. आणि भूकही जास्त लागते.

गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेदरम्यानही अनेक रूग्णांमध्ये रिकव्हरी झाल्यावरही अधिक भूक लागणे आणि जास्त खाण्याची समस्या बघायला मिळाली होती. ज्यामुळे अनेक रूग्णांचं एका महिन्यातच ८ ते १० किलो वजन वाढलं होतं आणि त्यांना लठ्ठपणाची समस्या झाली होती
 

Web Title: Coronavirus : Appetite or hunger increased after recovery from covid don't ignore this symptom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.