CoronaVaccine Side Effects : लस घेतल्यानंतर या ३ वर्गातील लोकांना साईड इफेक्ट्चा धोका जास्त; सीडीसीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 01:10 PM2021-04-04T13:10:38+5:302021-04-04T13:40:32+5:30

CoronaVaccine Side Effects : हात पाय थरथरणं, थकवा, उलटी, ताप, सुज आणि वेदना कोरोना लसीचे अनेक साईड इफेक्ट्स आहेत. काही लोकांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर वेदना आणि सुजेचा अनुभव केला आहे.  

CoronaVaccine Side Effects : who and why do some people get side effects from covid vaccine heres what you should know | CoronaVaccine Side Effects : लस घेतल्यानंतर या ३ वर्गातील लोकांना साईड इफेक्ट्चा धोका जास्त; सीडीसीचा खुलासा

CoronaVaccine Side Effects : लस घेतल्यानंतर या ३ वर्गातील लोकांना साईड इफेक्ट्चा धोका जास्त; सीडीसीचा खुलासा

googlenewsNext

कोरोनाव्हायरसच्या लसीनं कोरोना साथीच्या लोकांमध्ये आशेचा किरण आणला आहे. परंतु लस दिल्यानंतरही लोक घाबरत आहेत. याबद्दल सतत गोंधळ आणि संभ्रम आहे. कारण लसीकरणाचे काही दुष्परिणाम देखील आहेत. तथापि, हे प्रत्येकासह घडत नाही, परंतु लोकांच्या काही वर्गांमध्ये त्याचे गंभीर दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत.

संशोधनानुसार, लसीकरणानंतरचे दुष्परिणाम जवळजवळ प्रत्येकालाच होऊ शकतात, परंतु काही वर्गातील लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम अधिक दिसून येतात. लसीचा प्रभाव जास्त आहे, विशेषत: महिला आणि तरुणांमध्ये. त्याचबरोबर, या लसीमुळे कोविडमधून पूर्वी बरे झालेल्या लोकांचे आरोग्य खालावत आहे. म्हणूनच, या वर्गातील लोक लसीकरण करण्यापूर्वी आणि नंतर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

लसीकरणानंतर दिसणारे साईड इफेक्ट्स

हात पाय थरथरणं, थकवा, उलटी, ताप, सुज आणि वेदना, कोोरना लसीचे अनेक साईड इफेक्ट्स आहेत. काही लोकांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर वेदना आणि सुजेचा अनुभव केला आहे.  जास्तीत जास्त लोकांना त्वचा  लाल होणं,  खाज येणं. या समस्यांचा सामना करावा लागला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर काहीवेळ आराम करायला हवा. जेणेकरून लकरात लवकर रिकव्हर होत येईल. 

महिलांमध्ये दिसणारे साईड इफेक्ट्स जास्त

एका नव्या संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांना लसीचे दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असतो. याची पडताळणी करण्यासाठी, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रनं (सीडीसी) केलेल्या अभ्यासानुसार वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना लस देण्यात आल्या. एकूण लस घेतलेल्या महिलांचे दुष्परिणाम 79. टक्के होते.

कोविड शॉट घेतलेल्या 44 टक्के  स्त्रिया अशा होत्या.  ज्यांनी अ‍ॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान या  महिलांना फाइझर लसीचे शॉट्स देण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ही लस महिलांच्या शरीरात पोहोचते आणि काम करण्यास प्रारंभ करते तेव्हा महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वेगाने प्रतिसाद देते ज्यामुळे त्यांना लवकर दुष्परिणाम होतात.

एकदा कोरोना झालेल्या लोकांवर दुष्परिणाम जास्त

झीओओवर (कोविड सिमेंटम अॅप)  आधारित अभ्यासावनुसार फाइजर शॉट्स मिळवलेल्यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोकांना पूर्वी कोविड होता. ते म्हणाले की ही लस दिल्यावर थंडी वाजण्यासह संपूर्ण शरीरावर परिणाम त्यांच्यावर झाला. ज्यांना पूर्वी कोविड झाला नव्हता ते लसीकरणानंतरही पूर्णपणे सामान्य होते. वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

तरूणांवर जास्त दुष्परिणाम

लसीकरणानंतर  उद्भवत असलेल्या दुष्परिणामांचा सर्वाधिक परिणाम युवकांमध्ये दिसून आला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या कोची शाखेने केलेल्या अभ्यासानुसार, कोविड -10 लसीचे दुष्परिणाम वृद्धांपेक्षा भारतातील तरुणांमध्ये अधिक दिसून आले. अभ्यासात 539  सहभागींचा समावेश होता. ज्यामध्ये 20-29 वयोगटातील तरुण आणि 80-90 वयोगटातील ज्येष्ठ लोक समाविष्ट होते. लसीकरणानंतर, 81 टक्के तरूणांना दुष्परिणामांचा सामना करावा लागला, तर फक्त 7 टक्के लोकांवर याचा हलका दुष्परिणाम झाला. हे 7 टक्के लोक वयस्कर होते. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

Web Title: CoronaVaccine Side Effects : who and why do some people get side effects from covid vaccine heres what you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.