(image credit- airport technology)
चीनमध्ये कोरोना व्हायरस ज्या प्रमाणे झपाट्याने पसरत होता. त्याचप्रमाणे नियंत्रणात सुद्धा येत आहे. पण जगातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित होत असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. कोरोना व्हायरसची लक्षणं सामान्यपणे खोकला, ताप, श्वास घेण्यासाठी त्रास होणं ही आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरस शरीरात कोणत्या अवयवांवर प्रभाव पाडत असतो हे सांगणार आहोत.
कोरोना व्हायरस हा लहान लहान थेंबांद्वारे पसरत असतो.इन्फेक्टेड व्यक्तीच्या खोकण्यातून आणि शिंकण्यातून हा आजार पसरत असतो. हा व्हायरस हवेमार्फत पसरतो. एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तिकडून हा आजार म्युकस मेब्रेंनपर्यंत पोहोचतो. त्यानंतर गळ्यातून रिसेप्टर सेल्सपर्यंत पोहोचतो.
कोरोना व्हायरसच्या बाहेरच्या आवरणावर एक खास प्रोटीन असतं. ते सेल मेब्रेनशी जोडण्यास उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर जेनेटीक मटेरीयल व्हायरस पेशींपर्यंत पोहोचवत असतात. त्यानंतर शरीराची कार्यक्षमता कमी होत असते. नंतर या व्हायरसची संख्या हळू हळू शरीरात वाढू लागते.
अनेकांना कोरोनाचे इन्फेक्शन हे श्वसनतंत्रात न होता गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅकमध्ये झाले होते. यामुळे डायरीया आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते. परिणामी शरीराच्या विविध भागांना सुज येण्याची शक्यता असते. कोरोना व्हायरस हार्ट, किडनी, लिव्हर यांसारख्या शरीराच्या भागांवर सुद्धा परिणाम करू शकतो. ( हे पण वाचा-Corona Virus: संसर्ग टाळण्यासाठी घराची स्वच्छता कशी कराल? 'अशी' घ्या काळजी! )
कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकत असलेल्या ८० टक्के लोकांना सामान्य लक्षणं दिसून येत आहेत. तर २० टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचे आजार झाले आहेत. फक्त २ ते ३ टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. अशा लोकांना या व्हायरसचा फटका जास्त बसतो. ( हे पण वाचा- Corona Virus: समजून घ्या ‘कोरोना’; कोरोनाचे ‘पॅण्डेमिक’ म्हणजे नेमके काय?)