शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Corona virus : मास्क तर होतेच पण आता सॅनिटायझर सुद्धा बनावट, कारखान्यावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 11:03 IST

कोरोना व्हायरसपासून पासून बचाव करण्यासाठी तुम्ही वापरत असलेला मास्क आणि सॅनिटायझर बनावट सुद्धा असू शकतो.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यामातून जागृती केली जात आहे. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे.  अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सगळेच लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करत आहेत. अनेक ठिकाणी सॅनिटायजरचा तुटवडा पडला आहे. पण तुम्हाला कल्पनाही नसेल तुम्ही ज्या सॅनिटायर्सचा वापर कोरोनापासून बचाव होण्यासाठी करत आहात ते बनावट सुद्धा असू शकतात. 

काश्मीरमध्ये असे बनावट हँड सॅनिटायझर सापडलेत. कोरोना व्हायरसच्या भीतीनं लोकं हँड सॅनिटायझरचा भरपूर वापर करत आहेत, त्यामुळे मागणी वाढली आहे आणि याचा फायदा घेत काश्मीरमध्ये बनावट हँड सॅनिटायझर बनवलं जातं आहे. काश्मिर मधिल औषध आणि अन्न नियंत्रण विभागानं या ठिकाणी छापे टाकले आहेत. शिवाय याआधी अशा हँड सॅनिटायझर बाजारातही गेलेत. 

यानंतर प्रशासनाने नागबल गांदरबलमधील युनिट सील केलं आणि त्याचे दुवे एचएमटी श्रीनगर औद्योगिक वसाहतीत सापडले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी बनावट मास्कची विक्री केली जात असल्याचं समोर आलं होतं. आता मास्कनंतर बाजारात आलेले सॅनिटायझरही बनावट असू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी. ( हे पण वाचा- Corona virus : कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या महिलेच्या अनुभवाची व्हायरल पोस्ट)

याआधी जम्मूमध्ये कप सिरफमध्ये विषारी पदार्थ असल्याचं निर्दशनासआलं होतं. ज्यामुळे 9 मुलांचा मृत्यू झाला होता. कोल्ड बेस्ट पीसी कफ सिरप हे औषध हिमाचल प्रदेशमधील डिजिटल व्हिजन नावाची कंपनी तयार करते. चंदीगड इथल्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कफ सिरपमुळेच 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. या कफ सिरपमध्ये Diethylene Glycol या विषारी पदार्थ आढळला आहे. जो हानीकारक आहे.  त्यानंतर 8 राज्यांमध्ये या कफ सिरपच्या विक्रीवर बंद घालण्यात आली आहे. या राज्यात पोहोचलेल्या औषधाच्या बाटल्या परत मागवण्यात आल्या आणि त्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. ( हे पण वाचा- ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल)

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealth Tipsहेल्थ टिप्स