ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:25 AM2020-03-12T10:25:01+5:302020-03-12T10:29:23+5:30

बाहेरचा आहार घ्याल किंवा घरातील पदार्थ खाल मैद्याचा समावेश अनेक पदार्थांमध्ये  केला जातो. पदार्थाला कुरकुरीतपणा येण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. 

Healthy alternatives of refined flour for weight loss and control blood sugar myb | ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल

ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल

Next

सध्याच्या काळात अनियमीत जीवनशैलीमुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना सर्वाधिक लोकांना करावा लागत आहे. कितीही जरी डाएट करायचं ठरवलं तरी आहारात असे पदार्थ येत असतात. ज्यामुळे तुमचं वजन  कमी होत नाही. पण वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळत असतं.  बाहेरचा आहार घ्याल किंवा घरातील पदार्थ खाल मैद्याचा समावेश अनेक पदार्थांमध्ये  केला जातो. पदार्थाला कुरकुरीतपणा येण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. 

तुम्हाला माहीतच असेल की रिफाईंड पीठ शरीरासाठी चांगलं नसतं.  ब्रेड, पेस्ट्री, केक, सामोसा अशा अनेक पदार्थांमध्ये  मैद्याचा वापर केला जातो.  पण त्यामुळे तुमच्या  शरीराचं मोठं नुकसान होत असतं.  डायबिटीस, रक्तदाबाच्या  समस्या, लठ्ठपणा अशा अनेक समस्या उद्भवत असतात. आज आम्ही तुम्हाला मैद्याला पर्याय म्हणून तुम्ही कोणत्या पीठाचा वापर करून शकता याबाबत माहिती देणार आहोत. 

नाचणीचं पीठं

 नाचणीचा  समावेश सुपरफुडमध्ये होत असतो.  नाचणीच्या पीठात अनेक प्रोटीन्स. व्हिटामीन्स आणि कॅल्शियम असतं.  इतकचं नाही तर अनेक डायटरी फायबर्स यात असतात. त्यामुळे  डायबिटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा या पीठाचं सेवन फायदेशीर ठरेल.  ग्लुटेन फ्री असल्यामुळे पचायला हलकी असते.

ज्वारीचं पीठं

मैद्याच्या पीठाऐवजी तुम्ही  ज्वारीच्या पीठाचा आहारात समावेश करू शकता. त्यासाठी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश  करा, ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची आहे. या भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. वजन कमी करण्यासाठी ही भाकरी फायदेशीर ठरते. ( हे पण वाचा-Corona virus : कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या महिलेच्या अनुभवाची व्हायरल पोस्ट)

बाजरीचं पीठं

मैद्याचा आहार न घेता तुम्ही  आहारात बाजरीच्या पीठाचा समावेश केला तर नक्की फरक दिसून येईल.  हृदयासंबंधित आजारांनी त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी फायदेशीर ठरते. बाजरीमधील पोषक तत्व कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.  रक्तदाबाची समस्या सुद्दा नियंत्रणात राहते. ( हे पण वाचा-व्हायरल, बॅक्टेरिअल इन्फेक्शन टाळण्यासाठी जालिम उपाय काळा चहा!)

Web Title: Healthy alternatives of refined flour for weight loss and control blood sugar myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.