मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:38 PM2021-09-22T14:38:28+5:302021-09-22T14:39:39+5:30

भारतात कुठल्याही कंपनीला अशा प्रकारची सुरक्षितता मिळालेली नाही. यांत स्वदेशी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचा आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) कोविशील्डचाही समावेश आहे.

Corona Vaccine Moderna and pfizer set conditions for supply of vaccine india refused to accept | मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला 

मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला 

Next

अमेरिकेतील दोन लस उत्पादक कंपन्या, फाइझर आणि मॉडर्ना यांनी लस पुरवठ्यासंदर्भात ठेवलेल्या अटी मान्य करण्यास भारताने स्पष्ट नकार दिला आहे. एका वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी म्हटले आहे, की या दोन्ही अमेरिकन कंपन्यांनी हमी म्हणून असलेल्या संपत्तीचा वापर करण्यासंदर्भात जी अट ठेवली होती, ती भारत सरकारने स्वीकारली नाही. (Corona Vaccine Moderna and pfizer set conditions for supply of vaccine india refused to accept)

इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, सूत्रांनी म्हटले आहे, की फायझरने याच प्रकारे संपूर्ण जगात आपली लस पोहोचवली आहे. मात्र, या अटी भारत मान्य करणार नाही. केंद्राने, फायझर आणि मॉडर्ना यांच्या लसींच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही दुष्परिणामांवर कायदेशीर संरक्षणासाठी करण्यात आलेली विनंतीही नाकारली असल्याचे वृत्तात म्हणण्यात आले आहे. या दोन्ही लसी सध्या केवळ अमेरिका आणि युरोपातच तयार केल्या जात आहेत.

कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष

भारतात कुठल्याही कंपनीला अशा प्रकारची सुरक्षितता मिळालेली नाही. यांत स्वदेशी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचा आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) कोविशील्डचाही समावेश आहे.

मॉडर्नाच्या लसीला सिप्लाच्या माध्यमाने भारतात आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे. रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, भारतातील फायझरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, की सरकारसोबत चर्चा सुरू आहे आणि कंपनी भारतात आपली लस आणण्यासाठी वचनबद्ध आहे.


 

Web Title: Corona Vaccine Moderna and pfizer set conditions for supply of vaccine india refused to accept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.