शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine: भारतातील व्हॅक्सिनेशनमध्ये कंडोम तयार करणारी कंपनी बजावणार महत्वाची भूमिका, देण्यात आली मोठी जबाबदारी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 12, 2021 22:14 IST

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील.

नवी दिल्ली -केंद्र सरकारने दोन कंपन्यांसोबत कोरोना लशीसंदर्भात करार केला आहे. लशींच्या डोस बरोबरच त्यांची किंमतही निश्चित करण्यात आली आहे. सरकारने, भारत बायोटेक (कोव्हॅक्सीन) आणि सीरम इंस्टिट्यूट-ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकासोबत (कोविशील्ड) करार केला आहे. सरकारने 11 जानेवारीला भारत बायोटेकसोबत 55 लाख डोससाठी करार केला आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात एकूण 38.5 लाख तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 16.5 लाख लशी दिल्या जातील. यानंतर भारत बायोटेककडून आणखी 45 लाख डोस दिले जातील. सरकारने काही दिवसांपूर्वीच कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या इमरजन्सी वापराला मंजुरी दिली आहे. 16 जानेवारीपासूनदेशभरात लसिकरणाला सुरुवात होणार आहे.

कंपन्यांकडे मोफत लशीची मागणी - सरकारने सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे काही मोफत लशींची मागणी केली आहे. भारत बायोटेकसोबत मोफत डोससंदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे. तर सीरम इंस्टिट्यूटसोबत सध्या चर्चा सुरू आहे. कोविशील्डच्या एका डोसची किंमत 220 रुपये एवढी आहे. तर कोव्हॅक्सीनची किंमत टॅक्ससह 309 रुपये 50 पैसे एढी आहे. कोव्हॅक्सीनचा एकच डोस घ्यावा लागणार आहे, त्यामुळे हिची किंमत अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यांना पहिल्या टप्प्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. हा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे आणि हे पैसे पीएम केअर्स फंडातून येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

HLL करणार खरेदी - कंडोम तयार करणाऱ्या हिंदुस्तान लॅटेक्स लिमिटेड (एचआयएल) या सरकारी कंपनीला सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून करोनाच्या लशी विकत घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीने 1970च्या दशकात सरकारच्या कुटुंब नियोजन योजनेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी ही कंपनी निरोध नावाने कंडोम तयार करत होती.

भारत ब्राझीललाही निर्यात करणार कोरोना लस -भारतात तयार होणारी स्वदेशी लस आता ब्राझीललाही निर्यात केली जाणार आहे. 'कोव्हॅक्सीन' तयार करणारी औषध निर्माता कंपनी भारत बायोटेकने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे, की ब्राझीलला लस सप्लाय करण्यासाठी प्रीसिसा मेडिकामेंटो सोबत करार करण्यात आला आहे.

संभाव्य कोव्हॅक्सीनच्या निर्यातीसंदर्भातील चर्चेसाठी प्रीसिसा मेडिकामेंटोच्या एका चमूने गेल्या आठवड्यात भारत बायोटेकचा दौरा केला होता. या चमूने हैदराबाद येथील  जीनोम व्हॅली येथील भारत बायोटेकच्या ऑफिसमध्ये 7 आणि 8 जानेवारीला डॉक्टर कृष्णा इला यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेत भारतातील ब्राझीलचे राजदूत आंद्रे अरणा कोरंगा डू लागो हेही व्हर्च्यूअली सहभागी जाले होते. यावेळी त्यांनी ब्राझील सरकारच्या वतीने कोव्हॅक्सीनच्या खरेदीसंदर्भात इच्छा व्यक्त केली होती.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी