शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 11:27 IST

Corona Vaccination: देशातील लसीकरणात सर्वाधिक वापर सीरमच्या कोविशील्ड लसीचा होतोय

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या घरात आला आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाला गती दिली जात आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतरदेखील वाढवण्यात आलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लसींची टंचाई कायम आहे.सर्वात मोठा दिलासा! ...तर तुमच्या मुलांना कोरोनाचा कमी धोका; तुम्ही फक्त 'एवढंच' करादेशात लसींचा तुटवडा जाणवत असताना पुन्हा एकदा लसीच्या सिंगल डोसची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीचा केवळ एक डोस प्रभावी ठरू शकतो, असं ब्रिटनचे व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख केट बिंगम यांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं. यानंतर या वर्षी जानेवारीत जॉन्सन अँड जॉन्सनचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल स्टॉफल्स यांनीदेखील आपल्या लसीचा एकच डोस कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी पुरेसा असल्याचं म्हटलं होतं.फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईनकोविशील्डचा एकच डोस देण्याची चर्चा काही दिवसांपूर्वी भारतातही सुरू होती. त्यावेळी ट्विटरवर एकच गोंधळ उडाला. दुसऱ्या दिवशी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्टीकरण दिलं. 'कोविशील्ड लसीच्या वेळापत्रकात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. यापुढेही कोविशील्डचे दोन डोस दिले जातील,' असं पॉल यांनी सांगितलं. कोविशील्ड लसींची चाचणी ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुपचे संचालक अँड्र्यू पोलार्ड यांच्या देखरेखीखाली झाली. कोविशील्डचा एकच डोस घेतल्यास काय होईल, याची माहिती त्यांनी दिली.'सुरुवातीला आम्ही कोरोनावर एकच डोस असलेली लस तयार करत होतो. लवकरात लवकर लसीकरण करून जास्तीत जास्त जणांचे प्राण वाचवण्यास आमचं प्राधान्य होतं. मात्र ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानं आम्हाला उपलब्ध माहितीवर काम करण्यास वेळ मिळाला. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये तयार होणारी प्रतिकारशक्ती एक डोस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त असल्याचं अभ्यासातून समोर आलं,' अशी माहिती पोलार्ड यांनी दिली.'कोविशील्डचा एक डोसदेखील प्रभावी असल्याचं वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आलं आहे. याबद्दलची आकडेवारी उपलब्ध आहे. कोविशील्डचा एकच डोस घेतल्यानंतरही उच्चस्तरीय सुरक्षा मिळते. एक डोस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तरी त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. ती व्यक्ती घरीच कोरोनामुक्त होऊ शकते,' असं पोलार्ड यांनी सांगितलं.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या