शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करायचंय?, या 3 डिटॉक्स ड्रिंक्सचे करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 14:12 IST

लठ्ठपणा, वाढणारे वजन, पोटाचा सुटणार घेर आटोक्यात आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फसत असल्यानं हैराण झाले आहात. काळजी करू नका, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामामुळे तुमची ही समस्या नक्कीच सुटेल.

लठ्ठपणा, वाढणारे वजन, पोटाचा सुटणार घेर आटोक्यात आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फसत असल्यानं हैराण झाले आहात. काळजी करू नका, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामामुळे तुमची ही समस्या नक्कीच सुटेल. वजन घटवण्यासाठी व्यायाम करणं जेवढे महत्त्वाचे आहे, तितकेच पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवन करणंही आवश्यक आहे. यासोबत डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्यानंही वजन घटण्यास बरीच मदत मिळते. संतुलित आहाराच्या सेवनानंतर त्याच्या पचनप्रक्रियेत हे ड्रिंक्स महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. पचनप्रक्रिया चांगल्या पद्धतीनं होत असल्यास वजन घटवण्याच्या तुमच्या प्रयत्नात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. यासोबत, चयापचयाची प्रक्रियादेखील सुधारते. 

चयापचय (मेटाबॉलिजम )-पचनक्रिया योग्य असल्यास तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. 

1. लिंबू आणि आल्याचे डिटॉक्स ड्रिंकवजन घटवण्यासाठी जर तुम्ही या डिटॉक्स ड्रिंकचे योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात सेवन केले तर याचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येईल. लिंबू आणि आल्याचे हे पेय सकाळी उपाशी पोटी प्यावे. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळतेच, शिवाय चयापचयदेखील सुधारते. कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि एक इंच आल्याची पेस्ट करुन मिसळावी. दोन महिने रोज सकाळी दोन ग्लास या पेयाचे सेवन करावे 

2. दालचिनीचे डिटॉक्स ड्रिंकवजन कमी करण्यासाठी दालचिनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. डिटॉक्स ड्रिंक स्वरुपात तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे चयापचय सुधारतेच, शिवाय अतिरिक्त चरबीदेखील घटते. सपाट पोट असावं, अशी इच्छा असल्यास दालचिनीचे सेवन करावे. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन, त्यामध्ये एक छोटा चमचा दालचिनी पावडर टाकावी. झोपण्यापूर्वी हे डिटॉक्स ड्रिंक प्यावे. 

3. काकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स ड्रिंककाकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स ड्रिंक्स केवळ शरीरातील हानिकारक-विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकते. या ड्रिंकमुळे पचनक्रिया सुधारते. एक ग्लास पाण्यात काकडीचे तुकडे आणि पुदिन्याची पानं टाकावीत आणि हे पाणी प्यावे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य