शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

डोक्यातून मोबाइल ‘काढण्यासाठी’ दवाखाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 08:26 IST

लहान मुले आणि तरुणांमध्ये मोबाइलचे फॅड सध्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. मुले एकदा का या मोबाइलच्या जाळ्यात अडकली की, ती त्यातून बाहेर येणे प्रचंड कठीण. त्यामुळे मुलांच्या हातात जितक्या उशिरा मोबाइल येईल तितके चांगले.

व्यसनांची यादी करायची झाली, तर काय  आपल्या डोळ्यांसमोर येते? दारू, सिगारेट, तंबाखू, अमली पदार्थ... आणखीही काही असतील; पण समाजाच्या दृष्टीने ही मुख्य; पण या यादीत दिवसेंदिवस आता मोबाइल, विविध गॅजेटस् यांची भर पडत चालली आहे. गेल्या काही वर्षांत एक नाव यात समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे शॉपिंग; पण ही यादी इथेच थांबत नाही. अलीकडे त्यात व्हिडिओ गेमिंगचाही समावेश झाला आहे.

लहान मुले आणि तरुणांमध्ये मोबाइलचे फॅड सध्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. मुले एकदा का या मोबाइलच्या जाळ्यात अडकली की, ती त्यातून बाहेर येणे प्रचंड कठीण. त्यामुळे मुलांच्या हातात जितक्या उशिरा मोबाइल येईल तितके चांगले. याबाबत आता जगभरात पालकांमध्ये जागरूकता वाढते आहे. त्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करताहेत, त्यासाठीच्या सामाजिक चळवळीही सुरू झाल्या आहेत; पण मोबाइल मुलांच्या हाती जाणे थांबले का? किमान त्यांचा वयोगट तरी वाढला का? - तर नाही. उलट आता तर अगदी लहान मुलांच्याही हाती मोबाइल जातो आहे. जगभरातील जवळपास सारेच पालक याबाबत जागरूक असले तरी ते काहीही करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

मात्र, यामुळे आणखी एक मोठा धोका निर्माण झाला आहे, तो म्हणजे मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळण्याचा. त्याचे प्रमाण जगभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे की, त्याचा आता व्यसनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही रोगांच्या किंवा आजारांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाच्या (इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिजीज - आयसीडी) ताज्या आवृत्तीत या व्यसनाला गेमिंग डिसऑर्डर म्हणून वर्गीकृत केले आहे. अमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या व्यक्तींसाठी जगभरात जसे स्वतंत्र दवाखाने सुरू झाले आहेत, त्याचप्रमाणे या गेमिंग डिसऑर्डरवर इलाज करण्यासाठी अनेक देशांत दवाखाने सुरू होत आहेत. ब्रिटनमधील रिट्जी प्रायोरी क्लिनिकमध्येही यावर उपचार सुरू झाले आहेत. ज्यांना अमली पदार्थांचे व्यसन आहे, जे त्यातून लवकर बाहेर पडू शकत नाहीत, त्यांच्याच यादीत त्यांनी व्हिडिओ गेमचे व्यसन असणाऱ्यांचाही समावेश केला आहे.

कोपेनहेगन युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ रुन निल्सन यांचे तर म्हणणे आहे, ज्याप्रमाणे जुगार, निकोटीन, मॉर्फिन, अमली पदार्थांचे काही वर्षे सातत्याने सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचे व्यसन लागते आणि ती त्यातून बाहेर पडू शकत नाही, नेमकी तीच स्थिती व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागलेल्यांमध्ये आढळून येते. त्यामुळे गेमिंगच्या या व्यसनातून बाहेर पडण्यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि रुग्णाची सकारात्मकता त्यासाठी खूप महत्त्वाची ठरते.

आयसीडीच्या यादीमध्ये जुगाराव्यतिरिक्त फक्त गेमिंगचेच व्यसन म्हणून वर्णन केले गेले आहे. एकदा का एखादी व्यक्ती अमली पदार्थांसारख्या व्यसनांच्या आहारी गेली की, त्या व्यक्तीला भल्या- बुऱ्याचे काहीही भान राहत नाही, अगदी आपला प्राणही पणाला लावायची त्यांची तयारी असते, आपले आयुष्य बर्बाद होत असतानाही त्याचे त्यांना काहीही वाटत नाही, त्या व्यसनापासून दूर जाण्याची त्यांची तयारी नसते, अगदी तसेच गेमिंग डिसऑर्डरमुळेही होते, इतके हे व्यसन गंभीर आहे. मात्र, अजूनही अनेक जण त्याला व्यसन मानत नाहीत, जे या व्यसनाला बळी पडले आहेत, त्यांना तर ही अगदी सर्वसामान्य गोष्ट वाटते, उलट आपण जर तसे केले नाही, तर आपण ‘मागास’ ठरू, अशी भीती त्यांना सतावत असते, त्यामुळे या व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. याचे दुष्परिणाम केवळ एका पिढीवरच नव्हे, तर त्या देशावरही होतील याची चिंता तज्ज्ञांना सतावते आहे.

सिएटल येथील ‘गेमिंग ॲडिक्शन क्लिनिक रिस्टार्ट’च्या संचालक हिलरी कॅश यांचे म्हणणे आहे, माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांत बहुतांश तरुण आहेत. गेमिंगच्या व्यसनामुळे त्यातील अनेकांना शाळा किंवा कॉलेजातून काढून टाकण्यात आले आहे. यातही मुलींपेक्षा मुलांची संख्या खूपच जास्त प्रमाणात आहे. मानसशास्त्रज्ञ रुन निल्सन यांच्या मतेही गेम डेव्हलपर्सही एखाद्या गेमचे डिझाइन तयार करताना त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप विचार करतात. तरुणांना जास्तीत जास्त काळ कसे गुंतवून ठेवता येईल, त्यांना याचे व्यसन कसे लागेल, याचा विचार यात प्रामुख्याने केलेला असतो.

‘फ्रीमियम’ मॉडेलची नवी चालएक काळ असा होता, जेव्हा कुठलाही व्हिडिओ गेम खेळायचा, तर त्यासाठी पैसे मोजावे लागायचे. तो खरेदी करावा लागायचा. कंपनी आणि यूजर यांच्यात तो केवळ एका वेळेचाच व्यवहार असायचा; पण आता कंपन्यांनी ‘फ्रीमियम’ बिझिनेस मॉडेल आणले आहे. यात लोकांना  गेम फुकट खेळायला मिळतात. या काळातील जाहिरातींच्या माध्यमातून कंपन्या कोट्यवधी डॉलर्स कमावतात. त्यांच्या कमाईचा तब्बल ७३ टक्के हिस्सा ‘फ्री-टू-प्ले गेम्स’च्या माध्यमातून येतो. ॲपलच्या ॲप स्टोअरच्या माध्यमातूनही तब्बल ७० टक्के कमाई गेमिंगमुळे होते!

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन