शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शरीरात हे संकेत दिसताच समजा किडनी होत आहे खराब, कसा कराल बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 09:44 IST

Chronic Kidney Disease: सध्या भारतात क्रॉनिक किडनी डिजीजच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. ही चिंतेची एक मोठी बाब आहे.

Chronic Kidney Disease: किडनी आपल्या आपल्या शरीरातील फार महत्वाचा अवयव आहे. आपल्या पूर्ण आरोग्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. किडनीच्या कामाबाबत सांगायचं तर दर 30 मिनिटांनी किडनी शरीरातील रक्त फिल्टर करणं, टॉक्सिन आणि फ्लूइड बाहेर काढण्याचं काम करते. पण सध्या भारतात क्रॉनिक किडनी डिजीजच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. ही चिंतेची एक मोठी बाब आहे.

किडनीसंबंधी आजारांचे मुख्य कारण

जेव्हा तुमच्या दोन्ही किडनी पूर्णपणे डॅमेज होतात आणि रक्त फिल्टर होत नाही तेव्हा क्रॉनिक किडनी डिजीजच्या समस्येचा सामना करावा लागतो. किडनी योग्यपणे काम करत नसल्याने शरीरात फ्लूइड आणि वेस्ट पदार्थांचं प्रमाण जास्त वाढतं. ज्यामुळे अनेक समस्या जसे की, हृदयरोग आणि स्ट्रोकचाही सामना करावा लागतो. क्रॉनिक किडनी डिजीजमुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिजीज आणि लठ्ठपणा यांचाही धोका असतो.

सायलेंट किलर

किडनी डिजीजला सायलेंट किलर नावाने ओळखलं जातं. कारण याची कोणतीही लक्षणं सुरूवातीला दिसत नाहीत. ही समस्या हळूहळू शरीरात वाढते. ज्याची माहिती मिळवणं फार अवघड असतं. या आजाराची माहिती मिळवण्यासाठी रूग्णाला नियमितपणे ब्लड आणि यूरिन टेस्ट करावी लागते. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस असेल तर गरजेचं आहे की, तुम्ही नियमितपणे आपली ब्लड आणि यूरिन टेस्ट करावी. जेणेकरून किडनी डिजीज वाढण्यापासून रोखता येईल.

किडनी डिजीजचे संकेत

जेव्हा किडनीची समस्या वाढते तेव्हा शरीरा वेगवेगळे संकेत देऊ लागतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे संकेत....

वजन आणि भूक कमी लागणं

टाचांवर सूज

श्वास घेण्यास समस्या

थकवा

लघवीमधून रक्त येणं

सतत डोकदुखी

इतर समस्या

क्रॉनिक किडनी  डिजीजमुळे अनेक इतरही समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, एनीमिया, सहजपणे इन्फेक्शन होणं, शरीरात कॅल्शिअम कमी होणं, पोटॅशिअम आणि फॉस्फोरसचं प्रमाण वाढणं.

कसा कराल बचाव?

क्रॉनिक किडनी  डिजीजपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं. ब्लड आणि लघवीची नियमित टेस्ट करा. या आजाराचा धोका टाळण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल, मेडिकेशन, रेग्युलर मेडिकल चेकअप गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य