शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

जन्मापासून तुम्हाला असु शकतो कोलेस्ट्रॉल, वेळीच जाणून घ्या लक्षणे....नाहीतर दुष्परिणाम नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 17:15 IST

पालकांच्या जनुकांमधून मुलांमध्ये प्रसारित केले गेले तर मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल अगदी सुरुवातीपासूनच वाढू लागते. या आजाराला फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात. हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

शरीरात कोलेस्ट्रॉल असणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल पेशींच्या निर्मितीसह शरीरातील अनेक प्रक्रियांमध्ये भाग घेत असतं. कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात हार्मोन्स तयार होतात. पण, त्याचे जास्त प्रमाण शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. वास्तविक, रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थाच्या रूपात कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हृदयावर दाब वाढतो आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होतात.

सामान्यतः कोलेस्ट्रॉल वाढण्यास आपण खात असलेले अन्न जबाबदार असल्याचे मानले जाते, परंतु काहीवेळा ते जन्मजात (अनुवांशिक) कारण देखील असू शकते. जर ते पालकांच्या जनुकांमधून मुलांमध्ये प्रसारित केले गेले तर मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल अगदी सुरुवातीपासूनच वाढू लागते. या आजाराला फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात. हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

हायपरकोलेस्टेरोलेमियामुळेमेयो क्लिनिकच्या मते, कौटुंबिक हायपरकोलेस्टेरोलेमिया हे जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे होते जे आई किंवा वडील किंवा दोन्ही पालकांच्या जनुकांमधून मुलामध्ये जातात. या स्थितीत, रोग जन्माच्या वेळी होतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन हृदयविकार होऊ शकतो.

हायपरकोलेस्टेरोलेमियाची लक्षणे -हायपरकोलेस्टेरोलेमियामुळे लहान वयातच रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे धमन्या पातळ आणि कडक होतात. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे काहीवेळा ते त्वचेवर आणि डोळ्यांखाली जमा होऊ लागते. याशिवाय हात आणि पायांच्या शिरा जाड आणि कडक होऊ लागतात. तेथे कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. जेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप वाढते तेव्हा डोळ्यातील बाहुलीभोवती एक पांढरी किंवा तपकिरी रिंग तयार होते, जी सामान्यतः वृद्ध लोकांमध्ये दिसून येते. यामुळे कॉर्नियाचे गंभीर आजार होऊ शकतात.

उपचार काय -कौटुंबिक हायपरकोलेस्टेरोलेमियाची लक्षणे वयाच्या 20 वर्षांपूर्वी दिसून येतात. जर पालकांना हा आजार असेल तर मुलांना 10-12 वर्षे वयापासून डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टर स्टॅटिन, इझेटिमिब सारख्या औषधांनी उपचार करतात. याशिवाय या आजाराने त्रस्त व्यक्तीने वजन नियंत्रित ठेवावे लागेल. या रोगासाठी वनस्पती-आधारित अन्न, फळे आणि हिरव्या पालेभाज्या फायदेशीर आहेत. सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटपासून लांब राहिल्यास या आजाराच्या तीव्रतेपासून वाचू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स