चिन्मय घालणार, जांगड गुत्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 01:01 IST2016-03-15T08:01:00+5:302016-03-15T01:01:00+5:30

विदर्भ भाषेचा कलह असणारा जांगडा गुत्था या शब्दाचा अर्थ म्हणजे गोंधळ. तरूणाईचा लाडका हॅण्डसम बॉय नील म्हणजेच चिन्मय उदगीरकर घालणार गोंधळ.

Chinmaya, Jangad Gupta | चिन्मय घालणार, जांगड गुत्था

चिन्मय घालणार, जांगड गुत्था

 
िदर्भ भाषेचा कलह असणारा जांगडा गुत्था या शब्दाचा अर्थ म्हणजे गोंधळ. तरूणाईचा लाडका हॅण्डसम बॉय नील म्हणजेच चिन्मय उदगीरकर घालणार गोंधळ. विचारात पडला ना, घाबरू नका चिन्मय काय गोंधळ वगैरे घालणार नाही तर तो लवकरच शिवाजी पाटील दिग्दर्शित जांगड गुत्था या चित्रपटातून झळकणार आहे. हा चित्रपट तीन भावांच्यामध्ये असलेले प्रेम व त्यांच्या वेगवेगळया प्रकारच्या स्वभावावर आधारित आहे.या चित्रपटात समीर धर्माधिकारी, मंगेश देसाई, नागेश भोसले या स्टार कास्टचादेखील समावेश आहे. तर अभिजीत चव्हाण, आतिश देसाई, कांचन पगारे प्रितम कांगणे, रूचिरा या कलाकारांचादेखील समावेश आहे. लोकमत सीएनएक्सशी बोलताना चिन्मय म्हणाला,जांगड गुत्था या चित्रपटात समीर धर्माधिकारीचा लहान भाऊ असून,ती शेंडेफळाची मस्ती, लाड,कॉलेजचे नखरे व लव्हगुरूच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे त्याने सांगितले. असो, चिन्मयला त्याच्या चित्रपटासाठी व पुढील वाटचालीसाठी लोकमत सीएनएक्सच्या शुभेच्छा.
 

Web Title: Chinmaya, Jangad Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.