शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ना डाएट, ना जिम फक्त, ही चीनी टॅपिंग थेरपी वापरा, वजन कमी काळात मोठ्या प्रमाणावर कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:27 IST

जंक फुडच्या माऱ्यामुळे वजन अधिक वाढणे आलेच. मग अशावेळी डाएट ते तासन् तास जिममध्ये घाम गाळणे असे अनेक उपाय तुम्ही करत असाल. जर तरीही तुम्हाला त्यामुळे हवा तसा रिझल्ट मिळत नसेल तर ही नवी चीनी टॅपिंग थेरपी ट्राय करायला काय हरकत आहे?

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि त्यानुसार वाढलेल्या स्ट्रेसमुळे लठ्ठपणा ही सर्वसमान्य समस्या झाली आहे. त्यातही जंक फुडच्या माऱ्यामुळे वजन अधिक वाढणे आलेच. मग अशावेळी डाएट ते तासन् तास जिममध्ये घाम गाळणे असे अनेक उपाय तुम्ही करत असाल. जर तरीही तुम्हाला त्यामुळे हवा तसा रिझल्ट मिळत नसेल तर ही नवी चीनी टॅपिंग थेरपी ट्राय करायला काय हरकत आहे?

शरीराच्या काही भागांना बोटाने दाबून वजन कमी करता येऊ शकते. या तंत्राला EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक (emotional freedom technique) म्हणतात. टॅपिंग थेरेपी वजन कमी करण्यासाठी उपयोगी मानली जाते (Chinese Tapping therapy for Weight Loss). काही न्यूज रिपोर्टनुसार या फॉर्म्युलाद्वारे अनेक लोकांनी ५ महिन्यात सुमारे ३० पौंड म्हणजे सुमारे १३ किलो वजन कमी केले आहे.

काय आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक?द टॅपिंग सोल्यूशनच्या लेखिका जेसिका ऑर्टनर (Jessica Ortner, author of Tapping Solution) म्हणतात, EFT एक स्ट्रेस रिलीफ टेक्निक (stress relief technique) आहे जी सायकोलॉजी आणि चीनच्या प्राचीन अ‍ॅक्यूप्रेशर थेरेपीचे (Chinese Tapping Therapy) संमिश्र रूप आहे.

स्ट्रेस हार्मोनची लेव्हल कमी होतेहे तंत्र शरीरात कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची लेव्हल कमी करते, जे एन्जायटी, वजन वाढवणे किंवा झोपेसंबंधी समस्या वाढवण्याचे काम करते. या टॅपिंग टेक्निकने वजन कमी होते, तसेच स्ट्रेस आणि झोपेच्या समस्या सुद्धा कमी होतात.

९ विशेष ठिकाणांवर ५-७ वेळा फिंगर टॅपिंगटॅपिंग टेक्निक लोकांना नकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करते. जसे की एखादी न सुटलेली समस्या किंवा एखादी अशी गोष्ट ज्यासाठी व्यक्ती चिंतेत आहे. या दरम्यान शरीराच्या ९ विशेष ठिकाणांवर ५-७ वेळा फिंगर टॅपिंग केले जाते. शरीराच्या या भागांना मेरिडियन पॉईंट म्हटले जाते.

किती उपयोगी आहे हे तंत्र?काही स्टडीज टॅपिंगला स्ट्रेस कमी करण्याचे तंत्र मानतात. २०२० मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित एका स्टडीचे मुल्यांकन केले होते. यामध्ये टॅपिंग थेरेपीने ६० मिनिटे अगोदर आणि नंतर वॉलिटियर्सची स्ट्रेस लेव्हल चेक करण्यात आली होती. EFT च्या नंतर तज्ज्ञांना एन्जायटी, डिप्रेशनसह अनेक लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली.

टॅपिंग करणे सुरक्षित आहे का?टॅपिंगद्वारे स्ट्रेस कमी करणे हानिकारक नाही. असे करणे एकदम सुरक्षित आहे. परंतु टॅपिंगने वजन कमी करण्यावर कोणतेही संशोधन झालेले नाही, यासाठी याबाबत सध्या कोणताही दावा केला जाऊ शकत नाही. (Chinese Tapping Therapy)

न्यूट्रिशन आणि फूडचा उल्लेख नाहीयामध्ये सर्वात महत्वाची बाब ही आहे की, ईएफटीमध्ये कुठेही न्यूट्रिशन आणि फूडबाबत सांगण्यात आलेले नाही. तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्याच्या कोणत्याही पद्धतीसह न्यूट्रिशनची समज, खाण्यात योग्य वस्तूंचा पर्याय, हेल्दी कुकिंग टेक्निक आणि पोर्शन साईज माहित असणे आवश्यक असते.

टॅग्स :Healthआरोग्य