Chennais based company designed a facial recognition that comes with a breath analyser | आता ऑफिसला दारू पिऊन जाणं पडेल महागात, सॉफ्टवेअर चेहरा बघून एचआरला पाठवणार अलर्ट
आता ऑफिसला दारू पिऊन जाणं पडेल महागात, सॉफ्टवेअर चेहरा बघून एचआरला पाठवणार अलर्ट

(Image Credit : www.nbcnews.com)

आता लवकरच अल्कोहोलचं सेवन करणाऱ्यांना ऑफिसमध्ये एन्ट्री मिळणार नाही. चेन्नईच्या रॅमको कंपनीने एक अशी फेशिअल रिकग्निशन अटेंडंस  सिस्टीम तयार केलीये, जी श्वासांची गति मोजून तुम्ही किती नशेत आहात हे सांगले. या फेशिअल रिकग्निशन अटेंडंस सिस्टीममध्ये ब्रीथ अ‍ॅनालायजर वापर करण्यात आला आहे. याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याचं आणि श्वासांचं विश्लेषण केलं जाईल. आणि कर्मचारी नशेत असेल तर याची माहिती एचआरला पाठवणार.

हे असेल पुढचं पाऊल

कंपनीने दावा केला आहे की, ब्रीथ अ‍ॅनालायजर १०० टक्के खरं सांगण्यात सक्षम आहे. या तंत्रज्ञानामुळे ऑफिसमध्ये नशा करून येणाऱ्यांची ओळख सहजपणे पटवली जाईल. याने कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण राहील. कंपनीचे सीईओ विरेंदर अग्रवाल यांनी सांगितले की, ते आता असं सॉफ्टवेअर तयार करत आहेत, जे नशेसोबतच ड्रग घेण्याऱ्या लोकांनाही पकडेल. भारतात ड्रग्स घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

(Image Credit : norton.com)

आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये १७१ पायलट्सने विमान उडवण्याआधी नशा केला होता. यात काही आंतरराष्ट्रीय फ्लाइटही होत्या. जूनमध्ये दिल्लीच्या जल निगमच्या कर्मचाऱ्याचा अल्कोहोल घेतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. नंतर त्याला सस्पेंड करण्यात आले होते. 

जर्मनीमध्ये झालेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, भारतात २०१०-२०१७ दरम्यान अल्कोहोल घेणाऱ्यांची संख्या ३८ टक्क्यांनी वाढली आहे. याचा वाईट प्रभाव ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांवर आणि ऑफिसमधील वातावरणावर पडत आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, वेळेवर माहिती देऊन हे सॉफ्टवेअर मद्यसेवनामुळे होणारी मोठी दुर्घटना रोखण्यासाठी सक्षम आहे.


Web Title: Chennais based company designed a facial recognition that comes with a breath analyser
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.