शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवाताचा धोका अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:49 IST

पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे

वाशिम: पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे, असे स्पष्ट मत वाशिम येथे अस्थिरोग तथा संधिवात रोग तज्ज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी व्यक्त केले. संधिवात निवारण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी केलेल्या खास बातचीतदरम्यान ते बोलत होते.प्रश्न : संधिवात म्हणजे काय?डॉ. राठोड - संधिवाताला सांधेदुखी असेही म्हटले जाते. आपल्या सांध्यामध्ये ‘कुर्चा’ नावाचा घटक असतो. या ‘कुर्चा’मुळे सांध्यांची हालचाल योग्यरित्या होत असते. जेव्हा याची झीज व्हायला सुरूवात होते, सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासतात, त्यामुळे सांध्यात वेदना आणि सूज येऊ लागते. या स्थितीस संधिवात असे म्हटले जाते.प्रश्न : संधिवाताची लक्षणे कोणती?डॉ. राठोड - सांधे दुखणे, सुजणे, सांधे जाम होणे, कडकपणा येणे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर सांधे अवघडल्यासारखे होणे व चालता न येणे, अशक्तपणा जाणवणे ही संधिवाताची सुरूवातीचे लक्षणे आहेत. तीव्र स्वरुपाच्या संधिवातात सांधे वाकडे होऊ शकतात. सांध्याची वाकण्याची क्षमता कमी होते आणि रुग्णाला उठणे, बसणेही अशक्य होऊन जाते.प्रश्न : संधिवात प्रामुख्याने कोणत्या वयोगटात होण्याचा धोका अधिक संभवतो?डॉ. राठोड - संधिवात हा लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना होऊ शकतो. वाढत्या वयानुसार याचे प्रमाण वाढते. पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये संधिवाताचे प्रमाण जास्त आढळते. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही संधिवाताचे प्रमाण वाढत चालले आहे. साधारणत: चाळीशीनंतर संधीवात होण्याचा धोका अधिक संभवतो.प्रश्न : संधिवाताची कारणे काय असू शकतात?डॉ. राठोड - बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, स्थूलपणा येणे, नियमित व्यायाम न करणे, समतोल आहाराची कमतरता, एकाच सांध्यावर नियमितपणे भार पडत राहणे, मोबाईल व संगणकावर तासनतास चिटकून राहणे, हाडांचे फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने, अनुवंशिकतेमुळेही संधिवात होण्याचा धोका अधिक असतो. सांध्यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे सांधे खराब होऊ शकतात.प्रश्न : संधिवात होऊ नये म्हणून नागरिकांनी कोणती दक्षता घ्यायला हवी?डॉ. राठोड - नियमित व्यायाम करणे, आहाराचा योग्य समतोल राखणे, मोबाईल किंवा संगणकावर जास्त वेळ न राहणे, हाडांना इजा होणार नाही याची दक्षता घेणे, गुडघ्यांचा संधीवात असलेल्या रुग्णांनी खाली मांडी घालून न बसणे, पायरीवरून चढउतार कमी करणे आदी दक्षता घेता येतील. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स