शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

Summer health tips: उन्हाळ्यात 'या' फळाच्या सेवनाने वाढेल तुमची प्रतिकारशक्ती, व्हिटॅमिन सी ने आहे समृद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:56 IST

काजूसोबत तुम्ही त्याची फळेही खाऊ शकता. तुम्ही ती कच्ची किंवा शिजवूनही खाऊ शकता. आज काजू फळातील पोषक तत्वे आणि त्याचे फायदे जाणून (Cashew Apple Benefits) घेऊया.

सुक्या मेव्यांमध्‍ये (Dry Fruit) काजू खाणे बहुतेक लोकांना आवडतं. काजू (Cashew nut) अनेक पोषक तत्वांनीही परिपूर्ण आहे. काजू आपण हेल्दी स्नॅक म्हणूनही खाऊ शकतो. काजूबरोबरच काजू फळही (Cashew fruit) खायला हवीत, कारण तेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काजू फळ सुकल्यानंतर काजू मिळतो. काजूसोबत तुम्ही त्याची फळेही खाऊ शकता. तुम्ही ती कच्ची किंवा शिजवूनही खाऊ शकता. आज काजू फळातील पोषक तत्वे आणि त्याचे फायदे जाणून (Cashew Apple Benefits) घेऊया.

काजू फळांना काजू सफरचंद (Cashew Apple) असेही म्हणतात. त्यात झिंक, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ल्युटीन, मॅग्नेशियम, आहारातील चरबी, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट्स इत्यादी अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक (Benefits of Cashew fruit) असतात.

काजू फळ खाण्याचे फायदे

  • नफुडस्पेक्ट्रममध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, काजू फळामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट ल्युटीन डोळ्यांना प्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. प्रकाश खराब झाल्यामुळे अंधत्व आणि मोतीबिंदूची समस्या सुरू होऊ शकते.
  • काजू फळ खाण तापावर परिणामकारक आहे. याशिवाय पोटाचे आरोग्यही चांगले राहते.
  • अ‌ॅमेझॉनच्या जंगलात आदिवासी इन्फ्लूएन्झा आणि चामखीळींवर उपचार करण्यासाठी काजूच्या फळापासून तयार केलेला रस वापरतात.
  • काजू फळामध्ये असलेले प्रोटीन त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते.
  • गोवा आणि केरळ ही देशातील दोन राज्ये आहेत जी 'फेनी' आणि नॉन-अल्कोहोलिक पेये आणि काजूचा रस, सरबत, जाम, कँडीज, चटण्या आणि लोणचे यासारखी इतर उत्पादने तयार करण्यासाठी काजू फळाचा वापर करतात.
  • या फळामध्ये संत्र्यापेक्षा पाचपट जास्त व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटातील अल्सर, गॅस्ट्रिक समस्या दूर करतात.

काजू फळ कसे खावे?काजू फळ हा पल्पी किंवा त्यामध्ये फक्त गाभा असतो, काजू फळ हे काजूला चिकटलेलं असतं. काजू फळाचे वरचे टोक झाडातून बाहेर पडणाऱ्या देठाला चिकटलेले असते. त्याचे खालचे टोक काजूला जोडलेले असते, जे कवचात बंद असते. वनस्पतिशास्त्रीयदृष्ट्या, काजू हे एक सहायक फळ आहे, जे काजूच्या बियांवर वाढते. हे फळ तुम्ही ताजे खाऊ शकता. आपण ते भाज्यांमध्ये घालू शकता. तुम्ही त्याचा रस बनवून पिऊ शकता. यासोबतच चटणी, जामही बनवता येते. अनेक देशांमध्ये, अनेक प्रकारच्या पेयांची चव वाढवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. त्याची चव गोड तसेच तुरट असते. खाण्यापूर्वी ते चांगले धुवावे किंवा मिठाच्या पाण्यात दोन मिनिटे उकळल्यानंतरच वापरावे, त्यामुळे तुरट चव निघून जाते.

काजू खाण्याचे फायदे

  • हृदयाचे कार्य सुधारते
  • शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो
  • डोळे निरोगी राहतात
  • मधुमेह नियंत्रित करते
  • मेंदूचे कार्य सुधारते
  • कर्करोगाचा धोका कमी करते.
  • त्वचा निरोगी आणि तरुण बनवते
  • केस मजबूत, चमकदार बनवते
  • हाडांना बळ देते.
  • दात आणि हिरड्या निरोगी ठेवतात
  • पचन सुधारते
  • डोकेदुखी कमी होते.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स