आला नवरात्रीचा सण, पण डायबिटीस पेशंटनी सावधान...उपवास करताना घ्या 'ही' काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:37 PM2021-10-07T13:37:21+5:302021-10-07T14:00:22+5:30

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे.  डायबिटीस असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.

care diabetes patient should take while fasting or upvas | आला नवरात्रीचा सण, पण डायबिटीस पेशंटनी सावधान...उपवास करताना घ्या 'ही' काळजी!

आला नवरात्रीचा सण, पण डायबिटीस पेशंटनी सावधान...उपवास करताना घ्या 'ही' काळजी!

googlenewsNext

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे.  डायबिटीस असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.

टाइप २ डायबिटीस असणारे नवरात्रीचा उपवास ठेवू शकतात. परंतू त्याअगोदर त्यांनी डॉक्टराकडून आपल्या औषध संबंधी सल्ला घेतला पाहिजे. जर तुम्ही टाइप २ डायबिटीसचे रुग्ण आहात आणि नवरात्रीचा उपवास ठेवत असाल तर उपवास करण्यापूर्वी योग्य प्रमाणात गहू, डाळ, मेवा आणि प्रोटीनचे सेवन करणे आवश्यक आहे. आपण या सर्व गोष्टींचे योग्य प्रमाणात सेवन करत असल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आपल्यात उपवास करण्याची ताकद मिळेल. या व्यतिरिक्त निर्जला व्रत ठेवू इच्छित असणार्‍यांनी व्रतापूर्वी फळांचे रस, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.

जास्त वेळ उपाशी राहणे अशा रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे रक्तातील शुगर लेव्हल कमी जास्त होऊ शकते. अशात घाम फुटणे, कंपन येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या येऊ शकतात. डायबिटीस आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकूनही मिठाशिवाय उपवास ठेवू नका.

तसेच या दरम्यान तेलकट पदार्थ खाणे टाळा. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने इन्सुलिनमध्ये समस्या उद्भवू शकते. उपवास दरम्यान आपली शुगर लेवल तपासत राहा.

Web Title: care diabetes patient should take while fasting or upvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.