शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: ब्लड प्रेशरवर अत्यंत गुणकारी आहे 'हा' सुगंधी पदार्थ, गंभीर आजारांवर आहे अत्यंत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:15 IST

सुगंध आणि चवीसाठी वापरली जाणारी वेलची, जिला हिरवी वेलची किंवा छोटी वेलची देखील म्हणतात. ती आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

वेलची जवळजवळ दररोज माऊथ फ्रेशनर म्हणून आणि विविध पदार्थांमध्ये सुगंधासाठी वापरली जाते. त्यामुळे जेवणाची चव वाढवण्यासाठी खडा मसाला म्हणून वेलचीचा भरपूर वापर केला जातो. सुगंध आणि चवीसाठी वापरली जाणारी वेलची, जिला हिरवी वेलची किंवा छोटी वेलची देखील म्हणतात. ती आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. healthline.com ने दिलेल्या माहितीनुसार वेलची खाणे आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याबाबत जाणून घेऊया.

तोंडाची दुर्गंधी-दातांमध्ये पोकळी निर्माण होणे आणि श्वासात दुर्गंधी येणे ही खूप कॉमन समस्या आहे. पण ही समस्या जितकी कॉमन वाटत असली तरी तितकीच त्रासदायक आहे. दुर्गंधी घालवण्यासाठी वेलची तुम्हाला मदत करू शकते. याचे कारण असे की, वेलची तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि पोकळी रोखण्यास मदत करते.

रक्तदाब नियंत्रण -वेलची रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वेलचीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

पचनाच्या समस्या -आजकालच्या जीवनशैलीत अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या असणे अगदी कॉमन आहे. ही समस्या दूर करण्यात वेलचीही चांगली भूमिका बजावू शकते.

संसर्ग होत नाही -ऋतू बदलामुळे होणारे विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही तुम्ही वेलचीची मदत घेऊ शकता. याचे कारण असे की वेलचीमध्ये असलेले आवश्यक तेले आणि अर्क विविध प्रकारच्या जीवाणूंविरूद्ध लढण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

रक्तातील साखरेची पातळी -वेलची उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. उंदरांवरील अभ्यासात असे दिसून आले आहे की, वेलची उच्च रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

उलट्या, अस्वस्थता -वेलचीचा उपयोग पचनशक्ती राखण्यासाठी तसेच अस्वस्थता, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. वेलची इतर औषधी मसाल्यांमध्ये मिसळून देखील वापरले जाते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स