शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Cancer : 'या' लोकांना कॅन्सरचा जास्त असतो धोका, नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 19:23 IST

Cancer : रिसर्चमधून सांगण्यात आलं की, इंग्लंडमध्ये २०१३ पासून २०१७ दरम्यान समोर आलेल्या कॅन्सर केसेच्या आधारावर हा रिसर्च करण्यात आला आणि निष्कर्ष जारी करण्यात आले.

(Image Credit : nytimes.com)

कॅन्सर (Cancer) एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार झाला आणि वेळेत निदान झालं तर जीव वाचू शकतो. पण आजाराचं निदान उशीरा झालं तर जीवाला धोका होऊ शकतो. या आजाराबाबत करण्यात आलेल्या एका ताज्या रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. कॅन्सरवर रिसर्च करणारी संस्था कॅन्सर रिसर्च यूकेने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की,  गोरे नसलेल्या आणि आशियाई लोकांना कॅन्सर होण्याचा धोका कमी आहे. गोऱ्या लोकांना कॅन्सरचा धोका जास्त आहे.

रिसर्चमधून सांगण्यात आलं की, इंग्लंडमध्ये २०१३ पासून २०१७ दरम्यान समोर आलेल्या कॅन्सर केसेच्या आधारावर हा रिसर्च करण्यात आला आणि निष्कर्ष जारी करण्यात आले. या रिसर्चमधून समोर आलं की, गोऱ्या लोकांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका आशियाई लोकांमध्ये ३८ टक्के आणि सावळ्या लोकांमध्ये ४ टक्के कमी असतो. तसेच मिश्रित लोकांमध्ये हा धोका ४० टक्के कमी असतो.

यूकेमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका

BBC मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, गोऱ्या लोकांच्या तुलनेत सावळ्या आणि आशियाई लोकांमध्ये कॅन्सरबाबत असमानता आहेत. रिसर्चर कॅटरीना ब्राउन म्हणाल्या की, अशा लोकांमध्ये कॅन्सरचा धोका वेगवेगळ्या कारणांनी होतो. जसे की, व्यक्तीचं वय आणि त्याला पॅरेंट्सकडून मिळालेले जीन्स. त्या म्हणाल्या की, UK मध्ये कॅन्सरच्या ४० टक्के केसेस लाइफस्टाईलमध्ये बदल आणून रोखल्या जाऊ शकतात.

ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार,  यूकेमध्ये कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत. यावर आणखी रिसर्च करण्याची गरज आहे. रिसर्चच्या माध्यमातून हे समजून घेतलं जाऊ शकतं की, कशाप्रकारे वेगवेगळ्या समूहांच्या लोकांमध्ये कॅन्सर विकसित होतो.

नशेपासून दूर राहण्याचा सल्ला

वैज्ञानिकांनी या गोष्टीवर जास्त जोर दिला की, कॅन्सर रोखण्यासाठी स्मोकिंगपासून दूर रहा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा आणि वेळीच टेस्ट करा. असं करून कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ करतो.

गोऱ्यांना कॅन्सरचा धोका जास्त का?

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, गोऱ्या लोकांमध्ये स्कीन कॅन्सरचा धोका जास्त असतो. या लोकांमध्ये सूर्याच्या प्रखर किरणांमुळे स्कीन डॅमेज अधिक होते. पण याआधी झालेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं होतं की, गोऱ्या लोकांच्या तुलनेत सावळ्या लोकांमध्ये किंवा गोऱ्या नसलेल्या लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जास्त असतो.

रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, गोरे नसलेल्या आणि आशियाई कम्युनिटीच्या लोकांमध्ये कॅन्सरच्या केसेस जास्त नसण्याचं कारण म्हणजे स्मोकिंगची लेव्हल कमी होणे आहे. हेच कारण आहे की, गोऱ्या लोकांच्या तुलनेत गोऱ्या नसलेल्यांमध्ये बॉवेल, ब्रेस्ट आणि फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी आहे. 

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन