कॅन्सरची लक्षणं, समज, गैरसमज आणि नवी उपचार पद्धत; फोर्टिसच्या डॉक्टरांचा सल्ला पाहा lokmat.com वर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:29 PM2021-10-02T18:29:18+5:302021-10-02T18:38:04+5:30

Cancer symptoms and new treatment methods : डॉक्टरांनी कॅन्सरबद्दलचे समज आणि गैरसमज याबाबत माहिती दिली आहे. सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने लोकांना न घाबरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Cancer symptoms, perceptions, misconceptions and new treatment methods; Fortis doctors advice at lokmat.com | कॅन्सरची लक्षणं, समज, गैरसमज आणि नवी उपचार पद्धत; फोर्टिसच्या डॉक्टरांचा सल्ला पाहा lokmat.com वर

कॅन्सरची लक्षणं, समज, गैरसमज आणि नवी उपचार पद्धत; फोर्टिसच्या डॉक्टरांचा सल्ला पाहा lokmat.com वर

Next

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकदा गंभीर आजारांची लागण होते. असे काही आजार आहेत जे आपल्या शरीरावर हळूहळू आक्रमण करत राहतात, पण सामान्य माणसांना हे लवकर समजून येत नाहीत किंवा दुखण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आजाराची लक्षणे समजल्यानंतर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून डॉक्टरांचा सल्ला आणि औषधांच्या मदतीने लवकरात लवकर पुन्हा निरोगी होता येईल. यातीलच एक गंभीर आजार म्हणजे कॅन्सर. कर्करोग हा किती जीवघेणा आजार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, जर वेळीच या आजाराची माहिती मिळाली तर यापासून बचाव केला जाऊ शकतो. या आजारातून बाहेर आलेली कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतात. लोकमतने देखील वाचकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन यावर फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला आहे. कॅन्सर आणि त्यावरील नवनवीन उपचार पद्धतीबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

कॅन्सर म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात सर्वप्रथम भीती निर्माण होते. पण डॉक्टरांनी कॅन्सरबद्दलचे समज आणि गैरसमज याबाबत माहिती दिली आहे. सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने लोकांना न घाबरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. अनिल हेरूर (Head of Department & Senior Consultant - Surgical Oncology), डॉ. हितेश सिंघवी (Consultant - Surgical Oncology, Head & Neck Cancer), डॉ. निखिल धर्माधिकारी (Consultant - Surgical Oncology ), डॉ. राहुलकुमार चव्हाण (Consultant -Surgical Oncology) यांनी कोरोना आधी कॅन्सवर असलेले उपाय आणि आता झालेले बदल. तसेच प्रमुख लक्षणं कोणती, कॅन्सरबद्दल भीती काढून टाकण्यासाठी खास टिप्स, कशी काळजी घ्यावी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. 

डॉक्टरांनी Stomach Cancer, Gynae cancer, Oral (head/neck) Cancer, Colon Cancer याबाबत माहिती दिली आहे. तसेच फोर्टिसमधील नवनवीन उपचार पद्धतीचीही ओळख करून दिली. रुग्णालयात आता रोबोटिक्स सर्जरी लाँच करण्यात आली आहे. ही सर्जरी रोबोटच्या मदतीने करण्यात येणार आहे. पेनलेस सर्जरी देखील विकसित करण्यात आली आहे. यासोबतच Advanced oncosurgery unit देखील आहे. यामध्ये आता मुंबईमधील फोर्टिसच्या सर्व रुग्णालयात सारखीच ट्रिटमेंट मिळणं आता सोपं होणार आहे. म्हणजेच जर कल्याणचा एखादा पेशंट असेल आणि त्याला दादरच्या रुग्णालयातील डॉक्टरांकडे उपचार घ्यायचे असतील तर त्याला आता या युनिटमुळे दादरला येण्याची गरज नाही. कारण सेम डॉक्टर आणि सेम उपचार कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयात मिळणार आहे. डॉक्टरांचं मोलाचं मार्गदर्शन करणारा व्हिडीओ लवकरच Lokmat.com वर पाहता येणार आहे. 


 

Web Title: Cancer symptoms, perceptions, misconceptions and new treatment methods; Fortis doctors advice at lokmat.com

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.