शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

देशातील ११% लोकांना आयुष्यभर कर्करोगाचा धोका; काय आहेत याची कारणे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:16 IST

Cancer Risk in India: कर्करोगावरील संशोधनातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Cancer Risk in India: गेल्या काही वर्षांपासून कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांवर नजर टाकली तर भारत दुसऱ्या क्रमांकावर येतो, तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. या देशांमध्ये लोकसंख्याही जास्त आहे. ज्यामुळे कर्करोगाचे रुग्णही जास्त आढळतात. 

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर ग्लोबोकॅनच्या २०२२ च्या आकडेवारीनुसार, भारतात कर्करोगाचे सुमारे १४ लाख रुग्ण आढळले आहेत. तर, ९ लाखांहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. भारतात कर्करोगाचे रुग्ण इतके जास्त का आहेत, ते जाणून घेऊ...

कर्करोगाच्या वाढत्या घटना लक्षात घेता, अलीकडेच एक संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २० ऑगस्ट रोजी जावा नेटवर्कचा एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये असे म्हटले की, भारतातील प्रत्येक दहाव्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, लोकसंख्येच्या सुमारे ११ टक्के लोकांना या प्राणघातक आजाराचा सामना करावा लागतो. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम इन्व्हेस्टिगेटर ग्रुपने हे संशोधन केले आहे.

या अभ्यासात, ७ लाखांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यासोबतच, २ लाख प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला ज्यामध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाले. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, कर्करोग आता फक्त एक समस्या राहिलेली नाही, तर ती एक मोठे आव्हान बनले आहे.

कोणत्या राज्यांना जास्त फटका ?

मिझोरमची राजधानी ऐझॉल कर्करोगाच्या बाबतीत सर्वात जास्त प्रभावित आहे. येथे कर्करोगाच्या सर्वाधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. येथे, दर १ लाख पुरुषांपैकी २५६ पुरुषांना कर्करोग असल्याचे आढळून आले, तर दर १ लाख महिलांपैकी २१७ जणांना कर्करोग असल्याचे आढळून आले.

ईशान्य भारतातील ६ जिल्हे सर्वात गंभीर आहेत, जिथे कर्करोगाच्या सर्वाधिक प्रकरणे आढळून येत आहेत. याशिवाय, काश्मीर खोरे आणि केरळमध्ये देखील कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून आले. हैदराबादमध्ये, दर १ लाख महिलांपैकी १५४ महिला कर्करोगाच्या रुग्ण असल्याचे आढळून आल्या.

स्तनाचा कर्करोग आणि तोंडाच्या कर्करोगाचे अधिक प्रकरणदेशाच्या ईशान्य भागात दोन प्रकारच्या कर्करोगाचे प्रकरण वाढत आहेत. पहिला म्हणजे अन्ननलिकेचा कर्करोग. दुसरा म्हणजे पोटात होणारा कर्करोग. मोठ्या शहरांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोगाचे प्रमाणही जास्त आढळत आहे. गावांमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग सर्वाधिक आढळून आला.

दिल्लीची परिस्थिती चिंताजनक दिल्लीतील परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे. महानगरांमधील प्रदूषण, बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि तपासणीचा अभाव यासारख्या घटकांमुळे येथे कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिल्लीतील तरुणांमध्ये रक्त कर्करोगाचे (अ‍ॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया) रुग्ण वाढत आहेत.

दिल्लीत केवळ रक्त कर्करोगच नाही तर फुफ्फुसांच्या कर्करोगाचे रुग्णही वाढत आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे दिल्लीची प्रदूषित हवा आणि वाढते प्रदूषण. दररोज श्वासोच्छवासासह शरीरात प्रवेश करणारे PM2.5 सारखे विषारी कण फुफ्फुसांच्या कर्करोगाचे आणि इतर श्वसन रोगांचे सर्वात मोठे स्रोत आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीHealth Tipsहेल्थ टिप्स