शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी रोज दही खाणे म्हणजे आजारावर रामबाण, अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 15:27 IST

संशोधकांना असे आढळून आले आहे की, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी रोज दही खाल्ल्यास बीपी कमी करण्यास मदत होते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल डेअरी जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. भारताबद्दलच बोलायचे झाल्यास २०२० मध्ये सुमारे १५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे समोर आले. एका अहवालानुसार, गेल्या ४ वर्षांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सुमारे ३५ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात हा आजार सुरू आहे.

याविषयीच्या एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया आणि यूएसए युनिव्हर्सिटी ऑफ मेनच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलं आहे. यामध्ये, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित जोखीम घटकांवर दही खाण्याचा परिणाम तपासण्यात आला. ज्यामध्ये संशोधकांना असे आढळून आले आहे की, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी रोज दही खाल्ल्यास बीपी कमी करण्यास मदत होते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल डेअरी जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील एक अब्जाहून अधिक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यामुळे त्यांना हृदयाशी संबंधित समस्या म्हणजे CVD, जसे की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका जास्त असतो. CVD हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. यामुळे, अमेरिकेत दर 36 सेकंदाला एका व्यक्तीचा CVD मुळे मृत्यू होतो. ऑस्ट्रेलियामध्ये हा दर १२ मिनिटांचा आहे.

तज्ज्ञ काय म्हणतातसंशोधक डॉ. अलेक्झांड्रा वेड म्हणाल्या, 'उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये बीपी नियंत्रणासाठी दही उपयुक्त ठरू शकते. उच्च रक्तदाब हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा सर्वात महत्वाचा जोखीम घटक आहे, म्हणून आपण ते कमी करण्याचे आणि नियंत्रित करण्याचे मार्ग शोधत राहणे महत्त्वाचे आहे.

डॉ. अलेक्झांड्रा वेड पुढे म्हणाल्या, 'दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: दही बीपी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. याचे कारण म्हणजे दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, जे बीपी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ते म्हणाले की दही अधिक प्रभावी आहे कारण त्यात बॅक्टेरिया देखील असतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

संशोधन कसे झाले?संशोधकांनी या अभ्यासात ९१५ लोकांचा समावेश केला. अभ्यासात असे दिसून आले की जे लोक नियमितपणे दही खातात, त्यांचा रक्तदाब दही न खाणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे ७ पॉईंटने कमी होता. संशोधकांनी सांगितले की, जोखीम घटक असलेल्या लोकांवर दहीचे संभाव्य फायदे तपासण्यासाठी भविष्यात अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स