न जाणार डोळ्यांची दृष्टी न लागणार चष्मा, वैज्ञानिकांनी सांगितला एक बेस्ट उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 01:17 PM2024-04-16T13:17:49+5:302024-04-16T13:18:24+5:30

Eye Care tips :डॉक्टर्स सांगतात की, लाइफस्टाईल आणि आहारात गडबड त्याशिवाय वाढलेला स्क्रीनटाइमही डोळ्यांसाठी घातक आहे.

Blinking helps vision boost reduce dry eyes risks know how to keep eyes healthy | न जाणार डोळ्यांची दृष्टी न लागणार चष्मा, वैज्ञानिकांनी सांगितला एक बेस्ट उपाय

न जाणार डोळ्यांची दृष्टी न लागणार चष्मा, वैज्ञानिकांनी सांगितला एक बेस्ट उपाय

Eye Care tips : जगभरात डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. काही वर्षाआधी डोळ्यांच्या समस्या या वाढत्या वयातील समस्या मानल्या जात होत्या. पण आता कमी वयातही लोक याचे शिकार होत आहेत. डॉक्टर्स सांगतात की, लाइफस्टाईल आणि आहारात गडबड त्याशिवाय वाढलेला स्क्रीनटाइमही डोळ्यांसाठी घातक आहे. यामुळे कमी दिसणे, ड्राय आइज, डोळे दुखणे, ग्लूकोमा आणि काही स्थितींमध्ये डोळ्यांची दृष्टी जाण्याचीही शक्यता असते.

एक्सपर्ट सांगतात की, डोळे निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी पौष्टिक आहाराचं नियमित सेवन केलं पाहिजे आणि काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. पापण्यांची उघडझाप करण्याची सवय लावली तर फायदेशीर ठरू शकतं. असं मानलं जातं की, पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांचा ओलावा कायम राहतो आणि कोरडेपणाच्या समस्येचा धोका कमी राहतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये अभ्यासकांनी सांगितलं की, या सवयीमुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. 

कसा मिळतो फायदा?

अमेरिकेच्या रोचेस्टर यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या शोधानुसार, पुन्हा पुन्हा पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांचा ओलावा तर कायम राहतोच सोबतच डोळ्यांची दृष्टीही वाढते. अभ्यासकांना आढळलं की, जर तुम्ही सतत पापण्यांची उघडझाप केली तर रेटिना उत्तेजित होतो ज्यामुळे समोरचं स्पष्ट दिसण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर पापण्यांची उघडझाप केल्याने आपला मेंदुही सक्रिय राहतो. 

रिसर्चमधून काय समजलं?

विश्वविद्यालयातील न्यूरोसायंटिस्ट बिन यांग यांनी आपल्या पेपरमध्ये लिहिलं की, आम्हाला आढळलं की, पापण्यांची उघडझाप केल्याने रेटिनाची उत्तेजनेची शक्ती वाढते. डोळ्यांच्या मांसपेशींसाठी हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. मांसपेशी जेवढ्या सक्रिय राहतात, रक्तसंचारही चांगला राहतो. ज्यामुळे डोळे निरोगी राहतात सोबतच वेगवेगळ्या समस्यांपासूनही बचाव होतो.

याआधीच्या शोधातून समोर आलं की, पापण्यांची उघडझाप जास्त केल्याने आपली ध्यान क्षमताही अॅक्टिव होते. वस्तू ओळखण्यास मदत मिळते. त्याशिवाय डोळे कोरडे होत नाहीत. 

Web Title: Blinking helps vision boost reduce dry eyes risks know how to keep eyes healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.