शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पॅलेट गनमुळे अंधत्व आलेल्यांना मिळाली दृष्टी जळगावातील डॉक्टरांचा पुढाकार : काश्मिरात बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे मोफत शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 23:37 IST

जळगाव : काश्मीरमध्ये पॅलेट गनच्या मार्‍यातून डोळ्यांना होणार्‍या गंभीर इजांमुळे अंधत्व आलेल्या रुग्णांवर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे मोफत शस्त्रक्रिया केली जात असल्याने रग्णांना नवीन दृष्टी मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी जळगावातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्यामुळे देशातील विविध भागातील डॉक्टर काश्मीरमध्ये पोहचून तेथे मोफत सेवा देत आहे. तीन दिवसात तेथे ५० यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

जळगाव : काश्मीरमध्ये पॅलेट गनच्या मार्‍यातून डोळ्यांना होणार्‍या गंभीर इजांमुळे अंधत्व आलेल्या रुग्णांवर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे मोफत शस्त्रक्रिया केली जात असल्याने रग्णांना नवीन दृष्टी मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी जळगावातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्यामुळे देशातील विविध भागातील डॉक्टर काश्मीरमध्ये पोहचून तेथे मोफत सेवा देत आहे. तीन दिवसात तेथे ५० यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
सध्या काश्मिरात परिस्थिती गंभीर बनल्याने दगडफेकीसारखे प्रकार घडत आहे. यासोबतच पॅलेटगनद्वारे मारा केल्याने छर्रे डोळ्यात जाऊन डोळ्यांना गंभीर इजा होत आहे. या हल्ल्यामुळे डोळ्याला न सुधारणारा धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत छर्रा आतच राहिला तर डोळ्याची स्थिती नाजूक होते किंवा छर्रा काढला तरी जखम कायम राहून नजर कमी होऊ शकते. हे ओळखून रुग्णांचे हे अंधत्व टाळण्यासाठी जळगावातील नेत्ररोगतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नेत्ररोग संघटनेचे सहसचिव, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संघटक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी देशभरातील रेटीनल सर्जन (डोळ्याच्या मागील पडद्याची शस्त्रक्रिया) यांना सोशल मीडियाद्वारे काश्मिरात या शस्त्रक्रिया करण्यासाठी विनंती केली. त्यास देशभरातून लगेच प्रतिसाद मिळून ठिकठिकाणचे डॉक्टर तेथे जाण्यास तयार झाले. यामध्ये मुंबईच्या आदित्यज्योत हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. नटराजन, सैयद असगर हुसेन (चेन्नई), डॉ. केंगशू मारवाह (दिल्ली) यांनी तेथे जाऊन गेल्या तीन दिवसात ५० मोफत शस्त्रक्रिया केल्या. त्या पाठोपाठ सांगली येथील डॉ. गौरव परांजपे, औरंगाबाद येथील डॉ. आशीष होलानी हेदेखील श्रीनगर येथे पोहचले आहेत. या सर्वांचे, इतर खर्च या सर्वांची जबाबदारी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनने घेतली असून यात शासनाचा कोणताच संबंध नाही.
डोळ्यांना इजा झालेल्या रुग्णांची संख्या पाहता आणखी तीन डॉक्टरांची टीम संघटनेमार्फत तयार ठेवली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
शिबिरातील डॉक्टरांना श्रीनगर येथे नेण्याची तसेच सुरक्षेची जबाबदारी फाउंडेशनचे प्रकल्प प्रमुख ऋषिकेश परमार हे पाहत आहे. संस्थापक अदिक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.

----
काश्मीरमध्ये पॅलेटगनमुळे नजर गेलेल्यांवर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या पुढाकाराने डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांची आपण दृष्टी वाचवू शकलो, याचे मोठे समाधान आहे.
-डॉ. धर्मेंद्र पाटील, संघटक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन.