Black is fashionable : यंदाच्या पावसाळ्यात काळ्या रंगाचं महत्व का वाढतंय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 17:52 IST2017-06-23T17:52:59+5:302017-06-23T17:52:59+5:30
‘मिक्स अॅण्ड मॅच’च्या नव्या कॉण्ट्रास्ट मॅचिंगचा एक खास रंगमंत्रच!

Black is fashionable : यंदाच्या पावसाळ्यात काळ्या रंगाचं महत्व का वाढतंय?
पवित्रा कस्तुरे
काळा रंग अनेकांना आवडत, अनेकांना खूप आवडतो. त्यात आता पावसाळा. कुंद हवा. डल वातावरण. त्यात कुठं काळे कपडे घालणार? अजून उदासबिदास वाटेल असा एक समज आहेत. पावसाळ्यात ब्राईट, उष्ण रगांचे कपडे घालावेत असं म्हणतात. ते खरंही आहे. पण म्हणून काळा रंग वापरुच नये असं काही आहे का? तर तसंही नाही, कारण यंदा नुकत्याच सुरु झालेल्या पावसाळ्यातही काळ्या रंगाची मिक्स मॅच जादू बहार आणू शकेल. कारण काळा हा आता आॅलटाईम फेवरिट कलर मानला जातो. कॉण्ट्रास्ट मॅचिंगच्या काळात तर काळ्याचं महत्व अधिकच वाढतं आहे. स्ट्रीट फॅशन ते सेलिब्रिटी फॅशन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सध्या काळ्या रंगाची चलती आहे. एवढंच कशाला अलिकडे रंगीत छत्र्यांपेक्षाही काळ्या छत्र्या पुन्हा फॅशनेबल होत आहेत, त्यांना एक पर्सनल टच दिला जातो आहे. मुख्य म्हणजे आपण फॅशन ढ आहोत असं वाटत असलं तरी कशाहीबरोबर कधीही ब्लॅक रंग वापरता येतोच. त्यामुळे पावसाळी फॅशन विषयी आपलं घोर अज्ञान असलं तरी यंदा बिन्धास्त काळ्या रंगाचा वापर करा, ते हीट आहेच.
६) काळा रंग क्लासी दिसतो. आणि सोफिस्टिकेटेडही. उगीच बटबटीत नाही की लाऊड नाही. त्यामुळे काळ्या रंगाच्या कपड्यांतल्या माणसांची शोभा होत नाही.